कर्णकर्कश डीजेमुळे कुटुंबाच्या आरोग्यावर परिणाम:आजारी वडिलांना वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप

    08-Sep-2026

Pimpri Chinchwad DJ Noise Complaint
 
 
मुंबई (Pimpri Chinchwad DJ Noise Complaint) : पिंपरी-चिंचवड येथे एका महिलेने कर्णकर्कश आवाजात वाजणाऱ्या डीजे आणि साउंड सिस्टिममुळे त्यांच्या कुटुंबाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम झाल्याचा आरोप केला आहे. या मोठ्या आवाजामुळे आजारी वडिलांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळू शकली नाही आणि त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा तिने केलाय.(Pimpri Chinchwad DJ Noise Complaint)
 
मिळालेल्या माहितीनुसार, मोशी येथील मंत्र मूव्हमेंट सोसायटीत राहणाऱ्या वर्षा गणेश कदम यांनी आरोप केला की, सण-उत्सवांच्या काळात त्यांच्या घराच्या अगदी खाली मोठ्या आवाजात डीजे आणि साउंड सिस्टिम लावली जाते. आवाज इतका मोठा असतो की खिडक्या, दरवाजे आणि घरातील भांडीदेखील थरथरू लागतात, असे त्यांनी सांगितले. मोठ्या आवाजामुळे त्यांचे कुटुंब गेल्या सुमारे १० वर्षांपासून सणांच्या काळात घर सोडण्यास मजबूर असल्याचे वर्षा कदम यांनी सांगितले. कधी ते नातेवाईकांकडे राहतात, तर कधी स्वतःच्याच इमारतीच्या आठव्या मजल्यावरील रिफ्यूज एरियामध्ये रात्र काढावी लागते, असा त्यांचा दावा आहे.(Pimpri Chinchwad DJ Noise Complaint)
 
वर्षा यांनी सांगितले की, त्यांचे वडील गंभीर आजारी होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना घरी आणण्यात आले. त्यांना ऑक्सिजन सपोर्ट देण्यात येत होता. वर्षा यांनी उत्सव समिती आणि आयोजकांकडे साउंड सिस्टिमचा आवाज कमी करावा किंवा ती अन्य ठिकाणी हलवावी, अशी विनंती केली. मात्र, त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. घरातील मोठ्या आवाजामुळे वडिलांना बारामतीजवळील उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील त्यांच्या मूळ गावी घेऊन जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मात्र, गावाकडे जाणारा रस्ता आणि पूल खराब असल्याने रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू शकली नाही. अखेर वेळेवर उपचार न मिळाल्याने वडिलांनी त्यांच्या कुशीतच अखेरचा श्वास घेतला, असे वर्षा यांनी सांगितले.(Pimpri Chinchwad DJ Noise Complaint)
 
वर्षा यांनी पुढे सांगितले की, त्यांचा मुलगा वयाच्या पाचव्या वर्षापासून मिरगीच्या आजाराने त्रस्त असून सध्या बारावीच्या वर्गात शिकत आहे. वर्षा स्वतःही या आजाराने त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. वडिलांच्या निधनानंतरही सोसायटीमध्ये मध्यरात्रीपर्यंत मोठ्या आवाजात कार्यक्रम सुरू राहिल्याचा आरोप वर्षा यांनी केला. जेव्हा जेव्हा त्यांनी या कर्णकर्कश आवाजाला विरोध केला, तेव्हा त्यांना ‘धर्मविरोधी’ ठरवून लक्ष्य करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.(Pimpri Chinchwad DJ Noise Complaint)
 
वर्षा कदम यांनी सांगितले की, त्यांनी २०२३ मध्ये पोलिसांकडे पहिली लेखी तक्रार केली होती. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी त्यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात पुन्हा तक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्या जेव्हा जेव्हा ११२ क्रमांकावर पोलिसांना फोन करतात, तेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच साउंड सिस्टिम बंद केली जाते आणि पोलीस निघून गेल्यानंतर पुन्हा मोठ्या आवाजात ती सुरू केली जाते. आयोजकांकडून 'पोलीस ठाण्यात जाऊनही काही होणार नाही', अशा स्वरूपाच्या धमक्या देण्यात आल्याचाही आरोप कदम यांनी केला आहे. आता कदम कुटुंबीयांनी संबंधित आयोजकांवर कठोर कारवाई करण्याची तसेच सण-उत्सवांच्या काळातील अतिरेकी ध्वनिप्रदूषणापासून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.(Pimpri Chinchwad DJ Noise Complaint)
 
 
 
 




संबंधित मजकूर