मुंबई (Maulana Tauqeer Raza Khan Bail Rejected): हिंदूंना ‘सर तन से जुदा’ करण्याची धमकी दिल्याच्या आरोपातील इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिलचे संस्थापक मौलाना तौकीर रझा खान यांना इलाहाबाद उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. हे प्रकरण सप्टेंबर २०२५ मध्ये बरेली येथे झालेल्या हिंसाचाराशी संबंधित आहे. न्यायमूर्ती आशुतोष श्रीवास्तव यांनी सोमवारी या प्रकरणाची सुनावणी करताना म्हटले की, ‘सर तन से जुदा’ हा नारा भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आव्हान देणारा आहे.(Maulana Tauqeer Raza Khan Bail Rejected)
न्यायालयाने हा नारा ‘नारा-ए-तकबीर, अल्लाहु अकबर’, ‘जो बोले सो निहाल, सत श्री अकाल’, ‘जय श्रीराम’ किंवा ‘हर हर महादेव’ यांसारख्या घोषणांच्या समान मानता येणार नाही, असे स्पष्ट केले. न्यायालयाच्या मते, इतर घोषणांमधून देव किंवा गुरुप्रती आदर व्यक्त केला जातो; मात्र ‘सर तन से जुदा’ हा नारा कायद्याचे राज्य आणि देशाच्या सार्वभौमत्वाच्या विरोधात आहे. या प्रकरणात राज्य सरकारने मांडलेल्या युक्तिवादाशी न्यायालयाने सहमती दर्शवली.(Maulana Tauqeer Raza Khan Bail Rejected)
बरेली येथे मुस्लिम समाजाकडून ‘आय लव्ह मोहम्मद’ रॅली काढण्यात आली होती. याचदरम्यान हिंसाचाराची घटना घडली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, २६ सप्टेंबर २०२५ रोजी शुक्रवारी नमाज अदा केल्यानंतर मौलाना तौकीर रझा यांनी मुस्लिम समाजातील लोकांना इस्लामिया इंटर कॉलेज येथे एकत्र येण्याचे आवाहन केले होते. प्रशासनाने या रॅलीला परवानगी दिली नव्हती. तसेच भारतीय न्याय संहिता कमल १६३ अंतर्गत निर्बंध लागू करण्यात आले होते. तरीही मोठ्या संख्येने लोक हातात फलक घेऊन श्यामगंज चौकाच्या दिशेने निघाले आणि घोषणाबाजी केली. त्यानंतर परिस्थिती चिघळून हिंसाचार झाला.(Maulana Tauqeer Raza Khan Bail Rejected)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक