मुंबई, (Eco-Friendly Ganesh Idol Festival 2026): पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि उद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इको-फ्रेंडली गणेश मूर्ती रंगरंगोटी महोत्सव-२०२६’ तसेच खादी वस्त्रे व ‘मधुबन’ मध विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत हा उपक्रम होणार आहे.(Eco-Friendly Ganesh Idol Festival 2026)
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ग्रामीण आणि सूक्ष्म उद्योजकांना उद्योगाभिमुख मार्गदर्शन, प्रोत्साहन तसेच विपणन सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. मंडळाच्या नियंत्रणाखाली पुणे येथे कार्यरत असलेली हातकागद संस्था ही जुनी व ऐतिहासिक संस्था असून, संस्थेमार्फत विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक हातकागदाची निर्मिती केली जाते.(Eco-Friendly Ganesh Idol Festival 2026)
गणेशमूर्तींची रंगरंगोटी करण्याची संधी
पर्यावरण संरक्षणाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत जनजागृती करणे, हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश आहे. महोत्सवात पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची रंगरंगोटी करण्याची संधी नागरिकांना मिळणार असून, त्यासोबतच खादी वस्त्रे आणि ‘मधुबन’ मधाची विक्री व प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश पुढे न्यावा आणि पर्यावरण संरक्षणाच्या कार्यात आपला हातभार लावावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रविंद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत यांनी केले आहे.(Eco-Friendly Ganesh Idol Festival 2026)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....