नवी दिल्ली (Delhi Building Collapse) : राजधानी दिल्लीतील दक्षिण-पश्चिम दिल्लीच्या सत्य निकेतन परिसरात पाच मजली पीजी इमारत अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. विद्यार्थ्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या या इमारतीच्या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून १२ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले आहे. बचाव पथकाद्वारे युद्धपातळीवर बचाव आणि शोधमोहीम सुरू आहे.
🌆🏚️ THE BUILDING COLLAPSED IN JUST SECONDS… 😰📱
A normal afternoon in a crowded Delhi student neighborhood suddenly turns terrifying as a multi-storey PG building begins showing subtle signs of structural failure.
दुर्घटना रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता सत्य निकेतन परिसरात घडली. या परिसरात मोठ्या संख्येने विद्यार्थी पीजी आणि हॉस्टेलमध्ये राहतात. दुर्घटनेच्या वेळी इमारतीत विद्यार्थी तसेच कामगार उपस्थित असल्याचे सांगितले जाते. (Delhi Building Collapse)
इमारत अचानक कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात ढिगारा जमा झाला. घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. जेसीबी आणि इतर अवजड यंत्रांच्या मदतीने ढिगारा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले. (Delhi Building Collapse)
इमारत कोसळण्यामागे काय कारण?
इमारत कोसळण्याचे अंतिम कारण अद्याप अधिकृतपणे निश्चित झालेले नाही. मात्र प्राथमिक तपासात जुन्या इमारतीच्या तळ मजल्यावर सुरू असलेले दुरुस्तीचे काम आणि बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यामुळे इमारत कोसळल्याची प्रथनमिक माहिती सांगितली जाते. बेसमेंटमध्ये बांधकाम किंवा खोदकामाचे काम सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे. (Delhi Building Collapse)
इमारतीच्या संरचनेत अनधिकृत बदल किंवा अतिरिक्त बांधकाम झाले होते का, याचाही तपास सुरू आहे.
#WATCH | Delhi: Search and rescue operations are underway on a war footing in South Delhi's Satya Niketan area following a building collapse that claimed six lives. A continuous search operation is being conducted in the debris with the help of NDRF dogs, with potential locations… pic.twitter.com/jKxnw0Qa5H
बचाव पथकांनी आतापर्यंत १२ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले आहे. त्यापैकी काही जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मृतांचा आकडा सात वर पोहोचला आहे. (Delhi Building Collapse)
ढिगाऱ्याचा मोठा भाग हटवण्यात आला असून, बचाव पथकांचे लक्ष आता इमारतीच्या तळघराच्या भागाकडे आहे. आणखी कोणी ढिगाऱ्याखाली अडकले आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
मालकाविरोधात गुन्हा
या प्रकरणी पोलिसांनी इमारत मालक आणि इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मालक सध्या पोलिसांच्या संपर्कात नसल्याची माहिती असून त्याचा शोध घेण्यासाठी कारवाई सुरू आहे.
दरम्यान, या दुर्घटनेनंतर दिल्लीतील जुन्या पीजी आणि हॉस्टेल इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. (Delhi Building Collapse)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.