नाशिक (YCMOU MBA Entrance Exam 2026) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ करिता एम.बी.ए. (P79) शिक्षणक्रमाच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेची मुदत शनिवार दिनांक १२ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. या प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत शुक्रवार दिनांक ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत आहे.
एम.बी.ए. शिक्षणक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी संबंधित प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. प्रवेश परीक्षा व नोंदणीसाठी https://ycmapp.ycmou.org.in/login ही लिंक उपलब्ध असून, निर्धारित मुदतीपर्यंत ती २४ तास उपलब्ध राहणार आहे. प्रवेश प्रक्रियेबाबतच्या उर्वरित सर्व सूचना विद्यापीठाच्या दि. १५ जुलै २०२६ रोजीच्या परिपत्रकानुसार लागू राहतील. विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक श्री. भटूप्रसाद पाटील यांनी केले आहे. (YCMOU MBA Entrance Exam 2026)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....