मुंबई (Uttarakhand Waqf Board New Nikahnama) : समान नागरी संहिता (यूसीसी) अंतर्गत उत्तराखंड वक्फ बोर्ड एक न आणि कठोर निकाहनामा तयार करत आहे. हा लागू झाल्यानंतर राज्यात धर्मांतर केल्यानंतर निकाह करण्यावर पूर्णपणे बंदी येणार आहे. धर्मांतर करून निकाह करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना आता अनिवार्यपणे 'स्पेशल मॅरेज ॲक्ट' अंतर्गत विवाह करावा लागणार आहे. यासोबतच काझींनाही दुसरा निकाह लावता येणार नाही. उल्लेखनीय म्हणजे, यूसीसी मध्ये बहुपत्नीत्वाला कोणतेही स्थान नाही. त्यामुळे उत्तराखंडमध्ये राहणाऱ्या मुस्लिम पुरुषांना दुसरी किंवा तिसरी पत्नी ठेवता येणार नाही.(Uttarakhand Waqf Board New Nikahnama)
उत्तराखंड वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी सांगितले की, 'या नव्या निकाहनाम्यामुळे समाजात मोठा बदल घडून येईल.' या नव्या व्यवस्थेमुळे मुली अधिक सक्षम होतील आणि कमी वयात होणाऱ्या निकाहांनाही आळा बसेल, असा दावा करण्यात आला आहे. नव्या व्यवस्थेनुसार निकाह लावणाऱ्या सर्व मौलाना आणि उलेमांची 'युनिक आयडी' तयार केली जाणार आहे. नोंदणीकृत निकाहनाम्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी त्यामध्ये मौलाना आणि साक्षीदारांचे शपथपत्र, आधार कार्ड, छायाचित्र आणि स्वाक्षरी अनिवार्य करण्यात येणार आहेत. तसेच, होणारा प्रत्येक निकाहनामा वक्फ बोर्डाकडेही नोंदवला जाणार आहे.(Uttarakhand Waqf Board New Nikahnama)
मुस्लिम कॉलनी लक्खी बागचे प्रशासक मास्टर मुस्तकीम हसन, उलेमा आणि इतर संबंधित व्यक्ती मिळून या नव्या प्रारूपाची तयारी करत आहेत. सुधारणा आणि पारदर्शकतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात असून, ९ सप्टेंबर रोजी हे प्रारूप यूसीसी मसुदा समितीसमोर सादर केले जाणार आहे.(Uttarakhand Waqf Board New Nikahnama)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक