मुंबई, (Caste Validity Certificate) : सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अभियांत्रिकी, वैद्यकीय तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास विद्यार्थ्यांना आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शुक्रवारी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले.(Caste Validity Certificate)
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांचे व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रवेश निश्चित झाले आहेत, मात्र जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अडचणी येत आहेत, अशा विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. तसेच एसईबीसी आणि ओबीसी प्रवर्गातील प्रवेश निश्चित झालेल्या उमेदवारांसाठी यापूर्वी प्रवेशाच्या अर्जाच्या दिनांकापासून सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती.(Caste Validity Certificate)
ही अंतिम मुदत
नव्या निर्णयानुसार, ४ सप्टेंबरपासून पुढील तीन महिन्यांत संबंधित विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे. ही तीन महिन्यांची मुदत अंतिम संधी असून त्यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. जात वैधता प्रमाणपत्रामुळे प्रवेशात अडचणी आलेल्या विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.(Caste Validity Certificate)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....