५३० कुटुंबांची धर्मवापसी

ख्रिश्चन धर्माला सोडचिठ्ठी; वसईत वैदिक मंत्रोच्चारात पुन्हा सनातन धर्माचा स्वीकार

    05-Sep-2026

530 Families Return to Hinduism
 
 
खानिवडे, (विश्वनाथ कुडू) : वसई पूर्वेतील शिरसाड येथील भव्य लड्डूगोपाळ मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात तब्बल ५३० कुटुंबांनी वैदिक विधींच्या माध्यमातून ख्रिश्चन धर्मातून पुन्हा एकदा स्वेच्छेने सनातन हिंदू धर्मात पुनर्प्रवेश केला. या धर्मवापसी सोहळ्याला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज, देशभरातून आलेले साधू-संत, विविध आखाड्यांचे महंत आणि जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी स्वामी संस्थानचे हजारो अनुयायी उपस्थित होते.(530 Families Return to Hinduism)
 
मुंबई-अहमदाबाद महामार्गाजवळ अत्यंत भक्तिमय वातावरणात पार हा सोहळा पार पडला. पालघर व लगतच्या आदिवासी भागातील कुटुंबांनी गोमातापूजन, होम-हवन आणि मंत्रोच्चाराच्या साक्षीने आपल्या मूळ उपासनापद्धतीत पुनरागमन केले. "मी जन्माने हिंदू आहे, हिंदू म्हणूनच जगेन; हिंदू धर्माची उपासना, रितीरिवाज आणि परंपरा तंतोतंत पाळेन,” असा दृढ संकल्प धर्मवापसीच्या मुख्य विधीदरम्यान उपस्थितांनी केला. सुमारे तीन तास चाललेल्या या सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येक कुटुंबाचा वैदिक परंपरेनुसार सन्मान करण्यात आला.(530 Families Return to Hinduism)
 
अज्ञान, गरिबी आणि निरनिराळ्या आमिषांना बळी पडल्यामुळे अनेक कुटुंबांचे धर्मपरिवर्तन झाले होते. मात्र, स्वतःच्या मूळ संस्कृतीशी पुन्हा जोडले जाण्याची इच्छा असणार्‍या बांधवांना संस्थानच्या माध्यमातून धर्मवापसीचा हा सन्मानपूर्वक मार्ग उपलब्ध करून देण्यात आला, असे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांनी यावेळी सांगितले.(530 Families Return to Hinduism)
 
यानिमित्ताने उभारण्यात आलेले लड्डूगोपाळ मंदिर वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना ठरत आहे. दररोज सायंकाळी बालकृष्णाची पालखी माता यशोदा मंदिरात जाईल आणि पहाटे पुन्हा मुख्य गाभार्‍यात विराजमान होईल, ही या मंदिराची अद्वितीय परंपरा असणार आहे. सुमारे एक लाखांहून अधिक भाविकांनी या ऐतिहासिक क्षणाचे प्रत्यक्ष साक्षीदार होत बालकृष्णाचे दर्शन घेतले. भरकटलेल्यांना पुन्हा आपल्या घराचे वेध लागावेत आणि संस्कृतीशी नाते घट्ट व्हावे, हा या सोहळ्याचा मुख्य संदेश ठरला असून, या धर्मवापसीमुळे अनेक कुटुंबांच्या जीवनात नवचैतन्य आणि आत्मसन्मानाची नवी पहाट उगवली आहे.(530 Families Return to Hinduism)
 
आम्ही धर्म बदलला खरा, पण नंतर आमचे लक्षात आले की, आमचे देव ,आमची परंपरा , आमची आदिवासी संस्कृती दूर गेल्या प्रमाणे वाटले. कुठून तरी आम्हाला चुकल्यासारखे वाटू लागले. आमचे सगे सोयरे पण आमच्याशी नीट वागत नव्हते. त्यामुळे परत आम्हाला आमच्या धर्मात परत यायचे होते. पण परत यायचे कसे, हा प्रश्न होता. तेव्हा आम्हाला नरेंद्र महाराजांचा संदेश भेटला. त्यांनी मोठ्या सन्मानाने आमाला परत धर्मात आणले. आता आमी दुसर्‍यांना पण सांगतों की धर्म बदलू नका. आपला हिंदू धर्मच खरा आहे, अशी भावना धरवापसी केलेल्या उर्मिला सीताराम चौधरी आणि वनिता गावित या महिलांनी व्यक्त केल्या.(530 Families Return to Hinduism)
 
घरवापसी अभियानाचा ऐतिहासिक टप्पा
 
जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य स्वामी संस्थानच्या माध्यमातून आतापर्यंत देशभरात १.५६ लाखांहून अधिक कुटुंबांची यशस्वी धर्मवापसी करण्यात आली आहे. वसईतील शिरसाड येथील हा सोहळा त्याच घरवापसी अभियानातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि यशस्वी टप्पा मानला जात आहे.(530 Families Return to Hinduism)
 
 
 
 




संबंधित मजकूर