पुणे (Vidyanand Bapat AI Video) : डीजेविरोधातील वाद सुरू असतानाच पुण्यातील एका मंडळाने दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांचा AI व्हिडीओ स्क्रीनवर लावला. या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
या व्हिडीओमध्ये सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना नाचताना दाखवण्यात आले आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर “बापटसुद्धा नाचले” अशा स्वरूपाच्या कमेंट्स केल्या आहेत. (Vidyanand Bapat AI Video)
पोलिसांची कडक भूमिका
दरम्यान, दहीहंडी आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या ध्वनीमर्यादेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. (Vidyanand Bapat AI Video)