उत्सवांच्या नावाखाली ‘लष्कर-ए-उत्सव’-पत्रकार परिषदेतील वक्तव्याने विद्यानंद बापट पुन्हा चर्चेत

    04-Sep-2026   

Vidyanand Bapat
 
 
मुंबई (Vidyanand Bapat): गणेश उत्सवात डीजे विरोधात भूमिका घेणाऱ्या पुण्याच्या विद्यानंद बापट यांनी केलेल्या एका विधानामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उत्सवांच्या नावाखाली होणाऱ्या धुडगुसावर टीका करत त्यांनी ‘लष्कर-ए-तोयबा’च्या धर्तीवर ‘लष्कर-ए-उत्सव’ असा उल्लेख केला. हल्लेखोरांना वैचारिक प्रतिवाद करण्याऐवजी सवंग प्रसिद्धी हवी असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांना कोणत्याही धर्माच्या सण-उत्सवांना विरोध नसून या सार्वजनिक ठिकाणी धुडगूस घालण्याला त्यांचा विरोध आहे. शुक्रवारी विद्यानंद बापट यांनी याविषयी पत्रकार परिषद घेत माध्यमांना संबोधित केले. (Vidyanand Bapat)
गुरुवार, दि. ३ सप्टेंबर रोजी पुण्यातील टिळक रोडवरील कशाळे चौकात बापट मारहाण झाली होती. मारहाण करणारा संतोष चव्हाण याने बापट यांनी घेतलेल्या भूमिकेविरोधात हे कृत्य केल्याचे त्याने सांगितले होते. त्यानंतर दुसरा दिवशी बापट यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांना संबोधित केले. (Vidyanand Bapat)
 
उत्सवांच्या नावाखाली ध्वनी प्रदूषण आणि वाहतुकीचा अडथळा नागरिकांवर लादला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. डिजेचा मोठ्या प्रमाणातील आवाज म्हणजे ध्वनी प्रदूषण असून, त्यांनी त्याची तुलना ‘स्फोटक किलिंग’शी केली. ते म्हणाले की, आपला विरोध हिंदूंच्या किंवा कोणत्याही धर्माच्या सण-उत्सवांना नाही. सार्वजनिक ठिकाणी धुडगूस घालण्याला विरोध आहे. असा विचार करणाऱ्या व्यक्तीचा विचार कोणताही असला तरी काही लोक त्याला विरोध करतील. धार्मिक किंवा उत्सवप्रेमी व्यक्तींनीही सार्वजनिक ठिकाणी गोंधळाला विरोध केला, तरी त्यांच्याशी मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ शकतो . (Vidyanand Bapat)
 
मिरवणुकांबाबत बोलताना ते म्हणाले की, उत्सवांची परंपरा १३२ वर्षांची असली, तरी ती कालसुसंगत पद्धतीने बदलली पाहिजे. ध्वनी प्रदूषण काढून टाकल्यामुळे मंडळांनी मिरवणूक काढणेच टाळले तर तोही एक मार्ग चांगला आहे. मिरवणूक काढायचीच असल्यास शहराबाहेरील मोठ्या रस्त्यावर एका लेनमधून ती काढता येऊ शकते. (Vidyanand Bapat)
 
जिवंत असेन तर मोर्चात सहभागी होणार
 
रविवारी गुडलकपासून महापालिकेपर्यंत निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मी जिवंत असेन तर मोर्चात सहभागी होणार असे त्यांना पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा उल्लेख करत ते म्हणाले की, त्यांचे काय झाले, ते मॉर्निंग वॉकला निघाले होते. त्यामुळे केव्हा काय होईल हे मी सांगू शकत नाही. त्यामुळे जर मोर्चात जाण्यायोग्य परिस्थितीत मी असेन तर मोर्चात सहभाही होणार आहे. (Vidyanand Bapat)
 
 
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर