पतसंस्थेतील ठेवींच्या संरक्षणासाठी शासनाने पुढाकार घ्यावादरमहा १० युवकांना पतसंस्थेशी जोडण्याचे आवाहन;

रत्नागिरीत राज्य पतसंस्था फेडरेशनची वार्षिक सभा उत्साहात


Maharashtra Credit Societies Federation
 
 
मुंबई,(Maharashtra Credit Societies Federation) : पतसंस्थांच्या ठेवींना प्रभावी संरक्षण मिळावे यासाठी शासनाने भरीव योगदान द्यावे, तोपर्यंत संस्थांवर अंशदान भरण्याची सक्ती करू नये, तसेच पतसंस्थांना ‘क्रेडिट इन्स्टिट्यूशन’ म्हणून मान्यता देण्यासाठी केंद्रीय कायद्यातील तरतुदींचा वापर करावा, अशा विविध मागण्या आणि ठराव महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या वार्षिक सभेत करण्यात आले.(Maharashtra Credit Societies Federation)
 
रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आलेली फेडरेशनची वार्षिक सभा आणि अभ्यासवर्ग फेडरेशनचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील पतसंस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.(Maharashtra Credit Societies Federation)
 
ठेवीदारांच्या संरक्षणासाठी शासनाने पुढाकार घ्यावा
 
पतसंस्थांमधील ठेवींना अधिक प्रभावी संरक्षण देण्यासाठी शासनाने भरीव आर्थिक योगदान द्यावे आणि त्यासाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी करण्यात आली. ही यंत्रणा प्रभावीपणे कार्यान्वित होईपर्यंत पतसंस्थांवर अंशदान भरण्याची सक्ती करू नये, असा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. पतसंस्थांना ‘क्रेडिट इन्स्टिट्यूशन’ म्हणून मान्यता देण्यासाठी रिझर्व्ह बँकेने केंद्रीय कायद्यातील उपलब्ध तरतुदींचा योग्य वापर करावा, अशी भूमिकाही फेडरेशनने मांडली.(Maharashtra Credit Societies Federation)
 
दरमहा १० युवकांना संस्थेशी जोडा
 
पतसंस्थांनी केवळ आर्थिक व्यवहारापुरते मर्यादित न राहता समाजातील नव्या पिढीला जोडण्यावर भर द्यावा, असे आवाहन अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले. प्रत्येक पतसंस्थेने दरमहा किमान १० नवीन युवकांना संस्थेशी जोडण्याचा कार्यक्रम राबवावा, असे त्यांनी सांगितले. संस्थांनी आपली प्रतिमा अधिक विश्वासार्ह, शिस्तप्रिय आणि पारदर्शक ठेवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.(Maharashtra Credit Societies Federation)
 
डेटा संरक्षण कायद्यावर मार्गदर्शन
 
अभ्यासवर्गाचे उद्घाटन रत्नागिरीचे जिल्हा उपनिबंधक राम कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. माजी अध्यक्ष, जनता सहकारी बँकेचे अभय माटे, डॉ. सोपान शिंदे आणि सुहास पाटणकर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी प्रथमच डीपीडीपी कायदा आणि डेटा संरक्षण या महत्त्वाच्या विषयावर अभय माटे यांनी मार्गदर्शन केले. पतसंस्थांनी बदलत्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या माहितीच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.(Maharashtra Credit Societies Federation)
 
सहकाराचा रत्नागिरीत महामेळावा
कार्यक्रमाला फेडरेशनचे महासचिव राजोबा सर, उपाध्यक्ष डॉ. शिंगी, माजी अध्यक्ष काकासाहेब कोयटे, डॉ. भोसले, छाबडा, प्रा. आकरे, वाजे, तांबेकर, बांगर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. लवांदे यांच्यासह विभागीय फेडरेशनचे संतोष थेराडे, सिंधुदुर्ग पतसंस्थेचे अध्यक्ष राऊळ, डीसीसी बँकेचे संचालक सचिन भिंगारडे, शिवकृपा पतसंस्थेचे अध्यक्ष गोरखनाथ चव्हाण, छत्रपती संभाजी महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष लेंभे, राजापूर कुणबी संस्थेचे अध्यक्ष मांडवकर, नागपूर पतसंस्था जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र घाटे यांच्यासह राज्यभरातील अनेक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.(Maharashtra Credit Societies Federation)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर