मुंबई, (Kalayan in Mantralaya): भारतीय खगोलशास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम असलेले ‘कालायन’ समयदर्शक उपकरण तथा घड्याळ आता मंत्रालय परिसर आणि महाराष्ट्र विधान भवनात बसविण्यात येणार आहे. हे उपकरण केवळ वेळच दर्शवणार नसून यात भारतीय प्रमाण वेळ, सुर्योदय, सूर्यास्ताची वेळ, ग्रहांची स्थिती-गती, पंचांग, विविध दिनविशेष आणि महत्त्वाच्या कालखंडांची माहिती कळणार आहे. शुक्रवारी, सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.(Kalayan in Mantralaya)
मंत्रालय परिसर आणि महाराष्ट्र विधान भवन परिसरात प्रत्येकी एक ‘कालायन’ उपकरण बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक उपकरणासाठी ५ लाख ४८ हजार ७०० रुपये याप्रमाणे दोन्ही उपकरणांच्या खरेदीसाठी एकूण १० लाख ९७ हजार ४०० रुपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.(Kalayan in Mantralaya)
घड्याळात कोणती माहिती दिसणार?
‘कालायन’ हे केवळ वेळ दाखविणारे घड्याळ नसून त्यामध्ये प्रमाण वेळ व जीपीएस वेळ, सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ, ग्रहांची स्थिती व हालचाल, पंचांग, दिनविशेष तसेच विविध सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय घटनांची माहिती प्रदर्शित करण्याची सुविधा आहे.(Kalayan in Mantralaya)
‘आर्श विद्या प्रायव्हेट लिमिटेड’ या संस्थेने या उपकरणाची निर्मिती केली असून ‘कालायन’ उपकरणाची निर्मिती करणारी ही एकमेव संस्था असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. सुरुवातीला मंत्रालय आणि विधान भवन येथे प्रायोगिक तत्त्वावर ही उपकरणे बसविण्यात येणार आहेत.(Kalayan in Mantralaya)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....