मुंबई, (Chhagan Bhujbal OBC reservation): पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, “काही प्रमाणपत्र जातपडताळणी समितीने नाकारली आहे. ती प्रमाणपत्र दुरूस्त करून देतो असे काही आमदारांनी सांगितल्याचे मी ऐकले. असे असल्यास मुंबईत चार नगरसेवकांचे जात पडताळणीत प्रमाणपत्र रद्द झाल्याने त्यांचे पद गेले. मग तेसुद्धा तुम्ही दुरूस्त करून देणार आहात का?” असा सवाल त्यांनी केला. तसेच जे खरोखर कुणबी आहेत त्यांना आमचा विरोध नाही, असे म्हणत त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घेताना त्यावर खाडाखोडी केल्याचा आरोपही केला.(Chhagan Bhujbal OBC reservation)
ते पुढे म्हणाले की, “खाडाखोड करून तयार केलेले दाखले नाकारण्यात आले पाहिजे. जात पडताळणी समिती हे काम करू शकते. अनेकदा ओबीसी लोकांचेही कागदपत्रे नीट नसल्यास त्यांचे प्रमाणपत्र नाकारले जाते. उद्या जात पडताळणी समित्या नसतील तर, कुणीही अशी खाडाखोड करून कुठेही घुसतील आणि आरक्षण संपून जाईल. त्यामुळे जात पडताळणी समितीने निपक्षपातीपणे काम केले पाहिजे. कुठल्याही मंत्र्यांनी त्यांच्यावर दबाव आणता कामा नये. विधानसभेच्या निवडणूकीत ६० टक्क्यांहून अधिक ओबीसींनी महायुतीला मतदान केले आहे. त्यामुळे ही हक्काची मते दूर जातील असे काहीही होता कामा नये. याचे भान सगळ्यांनी ध्यानात घेतले पाहिजे.”(Chhagan Bhujbal OBC reservation)
...तर प्रत्येक जातीसाठी मंत्रालय द्या
“मराठा-कुणबी स्वतंत्र स्थापन करा, असे आता तुम्ही म्हणता. मग कुणबी ओबीसींमध्ये आहे की, नाही? आजही ओबीसी मंत्रालयात कुणबी लोक आहेत. मग मराठा-कुणबी मंत्रालय कसे होईल? करायचेच असेल तर, प्रत्येक जातीसाठी मंत्रालय करा. जे योग्य असतील त्यांना न्याय मिळाला पाहिजे. आम्ही त्यांच्या विरोधात नाही. पण अशा पद्धतीने पूर्ण ओबीसींचे आरक्षण संपणार नाही, हेही बघितले पाहिजे,” असेही ते म्हणाले.(Chhagan Bhujbal OBC reservation)
कोणते आरक्षण घेणार याबाबत प्रतिज्ञापत्र द्या
“तसेच तुम्हासा ओबीसी आरक्षण पाहिजे, मराठ्यांसाठी वेगळे असलेले एसईसीबीसी पाहिजे, खुल्या प्रवर्गाचे पाहिजे की, ईडब्ल्यूएस आरक्षण पाहिजे? याबाबात स्पष्टता आली पाहिजे. एकच मनुष्य कधी ओबीसीतून तर, आवश्यक असल्यास ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घेणार. त्यामुळे संबंधित माणसाने कोणते आरक्षण घेणार याबाबतचे प्रतिज्ञापत्र दिले पाहिजे. इकडून, तिकडून सगळेच आरक्षण घेतल्यास ते बरोबर नाही,” असेही मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.(Chhagan Bhujbal OBC reservation)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....