‘ऑपरेशन कोराग’ला मोठे यश! लष्कर-ए-तोयबाचा हाशिम मूसा चकमकीत ठार

 
Operation Korag Hashim Moosa
 
जम्मू-काश्मीर (Operation Korag Hashim Moosa) : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादाविरोधातील कारवाईत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बडगाम जिल्ह्यातील युसमार्ग परिसरात झालेल्या चकमकीत लश्कर-ए-तोयबाशी संबंधित एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. मृत दहशतवाद्याची ओळख मोहम्मद आसिफ उर्फ हाशिम मूसा अशी करण्यात आली आहे. मूसा पाकिस्तानस्थित लश्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
 
गुप्त माहितीच्या आधारे ऑपरेशन
 
भारतीय लष्कर, जम्मू-काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) संयुक्त पथकाने युसमार्गमधील कोराग परिसरात मंगळवार दि. २९ सप्टेंबर रोजी रात्री विशेष शोधमोहीम सुरू केली. दहशतवाद्यांच्या उपस्थितीबाबत सुरक्षा दलांना विशिष्ट गुप्त माहिती मिळाली होती. शोधमोहीम सुरू असताना जवानांना संशयास्पद हालचाली आढळल्या. (Operation Korag Hashim Moosa)
 
 
 
सुरक्षा दलांनी संशयितांना आव्हान दिल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या कारवाईत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. या ऑपरेशनला ‘ऑपरेशन कोराग’ असे नाव देण्यात आले आहे.
 
मृतदेहासह युद्धसदृश साहित्य जप्त
 
चकमकीनंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम अधिक तीव्र केली. बुधवार, दि. ३० सप्टेंबर सकाळी पालमैदान परिसरात करण्यात आलेल्या शोधादरम्यान मोहम्मद आसिफ उर्फ हाशिम मूसा याचा मृतदेह आढळून आला. त्याच्यासोबत युद्धसदृश साहित्यही जप्त करण्यात आले. घटनास्थळाच्या परिसरात पुढील शोधमोहीम सुरू असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिली आहे. (Operation Korag Hashim Moosa)
 
सध्या ऑपरेशन कोराग सुरू असून परिसरात आणखी दहशतवादी लपून बसले आहेत का, याचा शोध सुरक्षा दलांकडून घेतला जात आहे. त्यामुळे या कारवाईसंदर्भात पुढील तपशील सुरक्षा यंत्रणांकडून समोर येण्याची शक्यता आहे. (Operation Korag Hashim Moosa)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर