मुंबई(SNDT Women’s University): श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठ, मुंबईचे प्रभारी प्र-कुलगुरू म्हणून विद्यापीठाचे कुलसचिव प्रा. विलास नांदवडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरू कर्नल प्रा. डॉ. हेमलता बागला यांनी त्यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केलेत. (SNDT Women’s University)
विद्यापीठाच्या प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजात सातत्य, समन्वय आणि गतिमानता राखण्यासाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. विलास नांदवडेकर हे विद्यापीठाच्या कुलसचिवपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत असून, विद्यापीठातील प्रशासकीय व शैक्षणिक कामकाजाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. प्रा. विलास नांदवडेकर यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या प्रशासकीय तसेच शैक्षणिक कामकाजामध्ये अधिक प्रभावी समन्वय साधण्यास मदत होणार असून, विद्यापीठाच्या विविध उपक्रमांना आणि विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. (SNDT Women’s University)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....