युवकांपर्यंत पोहोचला बाबासाहेबांचा महिला सक्षमीकरणाचा विचार; राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव

कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन

    30-Sep-2026
Dr Ambedkar Essay Competition
 
मुंबई (Dr Ambedkar Essay Competition) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण व सत्कार समारंभ मंगळवारी चर्चगेट येथील एसएनडीटी महिला महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. (Dr Ambedkar Essay Competition)
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे सल्लागार जीवन ठोंबरे यांनी केले. स्पर्धेच्या माध्यमातून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महिला सक्षमीकरण, महिला शिक्षण, समानता आणि महिलांच्या हक्कांसाठीच्या योगदानाचा विचार युवकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. (Dr Ambedkar Essay Competition)
 
यंदाच्या निबंध स्पर्धेसाठी “महिलांच्या कल्याणासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान” हा विषय देण्यात आला होता. या स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ८३ हजारांहून अधिक निबंध प्राप्त झाले. विशेष म्हणजे, राज्यात प्रथमच निबंधांच्या मूल्यमापनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. एआय आधारित प्राथमिक मूल्यमापनानंतर निवडक निबंधांचे तज्ज्ञ परीक्षकांमार्फत प्रत्यक्ष मूल्यमापन करण्यात आले. अशा प्रकारे मोठ्या प्रमाणातील निबंधांचे मूल्यमापन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यासोबतच अंतिम मूल्यमापन प्रक्रियेत मानवी तज्ज्ञाचाही समावेश करण्यात आला. (Dr Ambedkar Essay Competition)
 
आयटीआय, एमसीव्हीसी आणि बायफोकल गटामध्ये प्रथम क्रमांक कु. प्रिती कुळ्ये, द्वितीय क्रमांक कु. संस्कृती पालवडे तर तृतीय क्रमांक श्री. रुद्राक्ष झिरपे यांनी पटकावला. तसेच खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांक श्री. विकास मसे, द्वितीय क्रमांक कु. रुपाली भगत/पाटील आणि तृतीय क्रमांक कु. सोनिया निकाळजे यांनी मिळविला. (Dr Ambedkar Essay Competition)
 
प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांचा सत्कार व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, सहसंचालक डॉ. अनिल जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. (Dr Ambedkar Essay Competition)
 
राज्यभरातून प्राप्त झालेल्या निबंधांमधून स्पर्धकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा तसेच महिलांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा विविध अंगांनी परामर्श घेतला. या स्पर्धेमुळे राज्यभरातील युवकांमध्ये लेखन, चिंतन व अभिव्यक्तीला प्रोत्साहन मिळण्यासोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि संविधानिक मूल्यांचा व्यापक प्रसार होण्यास मदत झाली. (Dr Ambedkar Essay Competition)
 
 




संबंधित मजकूर