अरबी समुद्रमार्गे ड्रग्ज तस्करीचा डाव उधळला! पाच पाकिस्तानी तस्कर जेरबंद

 
Arabian Sea Drug Smuggling 526 Kg
 
नवी दिल्ली (Arabian Sea Drug Smuggling 526 Kg) : भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसच्या संयुक्त कारवाईत अरबी समुद्रात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे लक्षद्वीप बेटांजवळ ही कारवाई करण्यात आली. या ऑपरेशनमध्ये एका इराणी बोटीला ताब्यात घेण्यात आले असून, त्यावरील पाच पाकिस्तानी तस्कर ताब्यात घेण्यात आले आहे.
 
तटरक्षक दलाने केलेल्या कारवाईदरम्यान बोटीतून तब्बल ५२६ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या ड्रग्जची अंदाजे किंमत ३ हजार कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. (Arabian Sea Drug Smuggling 526 Kg)
 
 
 
२५ सप्टेंबरपासून बोटीचा पाठलाग
 
भारतीय तटरक्षक दलाने सोशल मीडियाच्या माध्यमातून या कारवाईची माहिती दिली. प्राथमिक माहितीनुसार, संशयित बोटीबाबत माहिती मिळाल्यानंतर तटरक्षक दलाने समुद्रात कारवाई सुरू केली. दि. २५ सप्टेंबरपासून इराणची संशयित बोट तटरक्षक दलाच्या देखरेखीखाली होती. अखेर कारवाई करत ही बोट ताब्यात घेण्यात आली. (Arabian Sea Drug Smuggling 526 Kg)
 
या बोटीची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ आढळून आला. त्यानंतर बोटीवरील पाच पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. (Arabian Sea Drug Smuggling 526 Kg)
 
भारतातील कनेक्शनचा तपास सुरू
 
या कारवाईनंतर अमली पदार्थांच्या तस्करीचे भारतातील नेटवर्क आणि त्याचे संभाव्य कनेक्शन तपासले जात आहे. या तस्करीमागे कोणाचा सहभाग आहे, अमली पदार्थ कुठे पोहोचवले जाणार होते आणि भारतातील कोणत्या व्यक्ती किंवा नेटवर्कशी त्यांचे संबंध आहेत, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.
 
भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसच्या संयुक्त कारवाईमुळे समुद्रमार्गे होणाऱ्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील तपासाला महत्त्वाचे यश मिळाले आहे. (Arabian Sea Drug Smuggling 526 Kg)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर