‘No UPI Day’चा निर्णय अखेर मागे! अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर व्यापाऱ्यांचा मोठा निर्णय

 
 No UPI Day 2026
 
नवी दिल्ली (No UPI Day 2026) : यूपीआय व्यवहारांवरील प्रस्तावित मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) शुल्कावरून सुरू असलेल्या चर्चेला नवी दिशा मिळाली. बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासोबत व्यापारी प्रतिनिधींची बैठक झाल्यानंतर दि.२ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित असलेला ‘No UPI Day’ मागे घेण्यात आलेआहे. व्यापाऱ्यांच्या मागण्यांवर सरकारकडून विचार करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
 
व्यापारी संघटनांनी दि. २ ऑक्टोबर रोजी यूपीआय पेमेंटचा निषेध करण्याचे आवाहन केले होते. त्यामागे दि. १५ ऑक्टोबरपासून २ हजार पेक्षा जास्त पात्र UPI Person-to-Merchant व्यवहारांवर ०.४ टक्के MDR लागू करण्याचा निर्णय हे प्रमुख कारण आहे. या शुल्काचा थेट भार व्यापाऱ्यांवर येणार आहे. मात्र, सर्व यूपीआय व्यवहारांवर हे शुल्क लागू होणार नाही. (No UPI Day 2026)
 
काय आहे व्यापाऱ्यांची नाराजी?
 
व्यापाऱ्यांच्या मते, सणासुदीच्या काळात डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. अशा वेळी २ हजार पेक्षा अधिक व्यवहारांवर MDR लागू झाल्यास व्यापाऱ्यांच्या खर्चात वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रस्तावित शुल्काचा पुनर्विचार करावा, अशी मागणी व्यापारी संघटनांकडून करण्यात आली आहे. (No UPI Day 2026)
 
व्यापाऱ्यांच्या प्रमुख मागण्या
 
व्यावसायिकांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर चार प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
  • सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने, दि. १५ ऑक्टोबरपासून २ हजारांपेक्षा जास्त रकमेच्या UPI व्यवहारांवर लागू होणारे शुल्क माफ करावे, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. (No UPI Day 2026)
  • लहान व्यवसायांना दिलासा देण्यासाठी प्रस्तावित सवलतीची मर्यादा १ लाखावरून ५ लाखांपर्यंत वाढवावीन्याची मागणी केली.
  • व्यापारी-व्यापारी व्यवहारांवर कोणतेही अतिरिक्त एमडीआर शुल्क आकारले जाऊ नये. (No UPI Day 2026)
  • व्यापाऱ्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि त्यावर उपाय सुचवण्यासाठी सरकारने एक विशेष समिती स्थापन करावी.
दरम्यान, प्रस्तावित MDR १५ ऑक्टोबरपासून लागू होण्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यामुळे सरकार आणि व्यापारी संघटनांमधील पुढील चर्चेकडे आता लक्ष लागले आहे. (No UPI Day 2026)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर