नीरू धांडा-किनान चेनाईची सुवर्ण कामगिरी; ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात भारताला गोल्ड!

 
 Neeru Dhanda Kynan Chenai Gold Medal
 
टोकियो (Neeru Dhanda Kynan Chenai Gold Medal) : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय नेमबाज नीरू धांडाची सुवर्ण कामगिरी सुरूच आहे. वैयक्तिक ट्रॅप प्रकारात ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर अवघ्या एका दिवसात नीरूने किनान चेनाईसोबत आणखी एका सुवर्णपदकाला गवसणी घातली. ट्रॅप मिश्र सांघिक प्रकाराच्या अंतिम फेरीत भारतीय जोडीने ३४ गुणांची नोंद करत सुवर्णपदक पटकावले. या कामगिरीसह त्यांनी या प्रकारातील नवा आशियाई विक्रमही प्रस्थापित केला.
 
भारतीय जोडीने पात्रता फेरीत चौथे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र अंतिम फेरीत नीरू धांडा आणि किनान चेनाई यांनी शानदार पुनरागमन करत ४० पैकी ३४ गुणांची नोंद केली. कतारच्या मोहम्मद अल-रुमैही आणि रे बेसिल यांनी ३२ गुणांसह रौप्यपदक मिळवले, तर चीनच्या क्वी यिंग आणि सन युनोंग यांनी २३ गुणांसह कांस्यपदक पटकावले. (Neeru Dhanda Kynan Chenai Gold Medal)
 
विशेष म्हणजे, या प्रकारातील यापूर्वीचा आशियाई विक्रम कतारच्या नावावर होता. यावर्षी जानेवारीमध्ये कतारने ३० गुणांची नोंद करत हा विक्रम प्रस्थापित केला होता. भारतीय जोडीने ३४ गुणांसह हा विक्रम आपल्या नावावर केला.
 
 
 
नीरूची दोन दिवसांत तीन पदकांची कमाई
 
नीरू धांडासाठी ही आशियाई क्रीडा स्पर्धा विशेष ठरली आहे. मंगळवार, दि. २९ सप्टेंबर रोजी तिने महिला ट्रॅप वैयक्तिक प्रकारात सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. आशियाई क्रीडा स्पर्धेत ट्रॅप नेमबाजीत वैयक्तिक सुवर्ण जिंकणारी ती भारताची पहिली महिला नेमबाज ठरली. (Neeru Dhanda Kynan Chenai Gold Medal)
 
मिश्र सांघिक प्रकाराच्या पात्रता फेरीत किनान चेनाईने ७३ गुणांची नोंद करत भारताकडून चांगली कामगिरी केली. नीरूला मात्र ६३ गुणांवर समाधान मानावे लागले. आदल्या दिवशीच्या स्पर्धेमुळे शरीरात आलेला ताण तसेच पाऊस आणि थंडीचा परिणाम आपल्या कामगिरीवर झाल्याचे नीरूने सांगितले. मात्र अंतिम फेरीत तिने आपला खेळ उंचावत किनानला उत्तम साथ दिली. (Neeru Dhanda Kynan Chenai Gold Medal)
 
किनान चेनाईनेही अंतिम फेरीत सातत्यपूर्ण कामगिरी केली. या दोघांनी यापूर्वी याच वर्षी विश्वचषक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. त्यामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेतील त्यांच्या जोडीकडून मोठ्या अपेक्षा होत्या आणि त्यांनी त्या अपेक्षा पूर्ण करत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले.
 
या सुवर्णपदकामुळे भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकतालिकेत आणखी भर पडली असून, ट्रॅप मिश्र सांघिक प्रकारात भारताने प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले आहे. (Neeru Dhanda Kynan Chenai Gold Medal)
 
 




मुंबई तरुण भारत वेब टीम

Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
 
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
 
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.
 
Now get all the updates in one click! mahamtb.com
संबंधित मजकूर