मुंबई(अभिनंदन परुळेकर ) : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील उत्तूूर येथील गावातील वृषाली कांबळे हीने सर्वात कठीण असलेली आयएएस ही परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून मसुरे येथे प्रशिक्षण देखील पूर्ण केले. त्यानंतर नुकतेच गुजरात येथील जुनागड जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून तिने मंगळवार दि. १ सप्टेंबर पासून पदभार स्वीकारला आहे.(Vrushali Kamble IAS)
देशात ३१० व्या क्रमांकासह केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेत २०२४ साली यश प्राप्त केले होते. वृषाली चे दहावीपर्यंतचे शिक्षण सेंट ऑगस्टीन स्कूल मध्ये तर बारावीचे शिक्षण एस आय ई एस कॉलेज येथे पूर्ण झाले. त्यानंतर मुंबई येथील सेंट झेवियर कॉलेजमधून तिने कला शाखेत पदवी प्राविण्यसह पूर्ण केली. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना पहिल्या प्रयत्नात आलेल्या अपयशानंतर त्यांनी पुन्हा जोमाने सुरुवात केली बार्टी येथे घेतलेला स्पर्धा परीक्षा संबंधित शिक्षणाचा तिला खूप फायदा झाला.(Vrushali Kamble IAS)
"एखादे ध्येय निश्चित केल्यानंतर इतर आमिषांपासून बाजूला राहून ध्येय प्रति समर्पित भावनेने काम करावे. म्हणजे यश हमखास मिळेल."अशी भावना वृषाली कांबळे हिने आपल्या स्पर्धा परीक्षेतील यशानंतर बोलताना व्यक्त केली होती. या तिच्या यशानंतर उत्तूर गावात तिचे जंगी स्वागत होऊन ,संपूर्ण गावच्या वतीने सत्कार व मिरवणूक देखील काढली होती.(Vrushali Kamble IAS)