मुंबई, (Tata AI Innovation City Navi Mumbai): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ टाटा समूहाच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या भारतातील पहिल्या 'एआय इनोव्हेशन सिटी'च्या कामाला गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कालबद्ध आराखडा तयार करत आहे. 'रिअल इस्टेट अँड इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टर्स समिट २०२६' दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सल्लागार (गुंतवणूक व रणनीती) कौस्तुभ धवसे यांनी ही माहिती दिली.(Tata AI Innovation City Navi Mumbai)
सुमारे ३०० एकर जागेवर पसरलेला हा प्रकल्प ११ अब्ज डॉलरच्या प्रचंड गुंतवणुकीचा संयुक्त उपक्रम आहे. यामध्ये उच्च-क्षमता संगणन केंद्र, सेमीकंडक्टर सुविधा, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स (GCCs) आणि मोठ्या प्रमाणातील एआय डेटा सेंटर्सचा समावेश असेल. महाराष्ट्राचे वैशिष्ट्य सांगताना धवसे यांनी नमूद केले की, सध्या देशातील एकूण डेटा सेंटर क्षमतेपैकी सुमारे ६६ टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे.(Tata AI Innovation City Navi Mumbai)
या परिषदेत उद्योगातील प्रमुख नेत्यांनी एकत्र येत दीर्घकालीन विकासासाठी तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या एकत्रीकरणावर भर दिला. या समीटमधील मुख्य चर्चा शाश्वत नागरी नियोजन, सीमेपलीकडील गुंतवणूक (Cross-border funding), प्रॉपटेक (PropTech) आणि भविष्यासाठी सज्ज पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एआयचा वापर करण्यावर केंद्रित होती.(Tata AI Innovation City Navi Mumbai)
अदानी एंटरप्रायझेसचे संचालक प्रणव अदानी यांनी नवीन नागरी कॉरिडॉरची क्षमता अनलॉक करण्यासाठी आणि भारताच्या पुढील टप्प्यातील आर्थिक विकासाला पाठबळ देण्यासाठी पायाभूत सुविधा आणि रिअल इस्टेटच्या एकत्रीकरणावर भर दिला.(Tata AI Innovation City Navi Mumbai)
नरेडको इंडियाचे अध्यक्ष डॉ. निरंजन हिरानंदानी यांनी या बदलाचे वर्णन "मुंबई ३.०" असे केले. सुधारित कनेक्टिव्हिटीमुळे निवासी, व्यावसायिक, लॉजिस्टिक्स आणि डेटा सेंटर्ससारख्या क्षेत्रात नवीन शक्यता निर्माण होत असून, यामुळे भारताच्या बहु-ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे जाणाऱ्या प्रवासाला बळ मिळेल असे त्यांनी सांगितले.(Tata AI Innovation City Navi Mumbai)
नरेडको महाराष्ट्रचे अध्यक्ष कमलेश ठाकूर यांनी २०४७ पर्यंत भारताचे ३० ट्रिलियन डॉलरचे आर्थिक उद्दिष्ट गाठण्याच्या दृष्टीने मुंबईच्या पुनर्विकासाकडे सुट्या प्रकल्पांऐवजी एक संपूर्ण आणि दीर्घकालीन कायापालट म्हणून पाहण्यावर त्यांनी भर दिला.(Tata AI Innovation City Navi Mumbai)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.