मुंबई (Parner Assault Case) : यात्रा उत्सवात लहान मुलांचा पाळणा लावण्याच्या किरकोळ वादातून एका हिंदू महिलेला व तिच्या कुटुंबीयांना धर्मांध मुस्लिमांच्या जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातील मौजे ढोकी येथे घडली आहे. रस्त्यासाठी जागा सोडण्यावरून झालेल्या बाचाबाचीतून ही मारहाण झाली असून, याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.(Parner Assault Case)
मिळालेल्या एफआयआर कॉपीनुसार, पीडित महिला, त्यांचे पती आपल्या मुलांसह नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील विविध यात्रा उत्सवांमध्ये लहान मुलांचा पाळणा लावून आपला व्यवसाय करतात. श्री महादेवाच्या यात्रा उत्सवानिमित्ताने त्या दि. २४ ऑगस्ट रोजी पारनेर तालुक्यातील मौजे ढोकी येथे पाळणा घेऊन आल्या होत्या.(Parner Assault Case)
दि. २९ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास, भाविकांना ये-जा करण्यासाठी मोकळी जागा राहावी म्हणून शेजारी मोठा पाळणा लावणाऱ्या इब्राहिम अजिजखान पठाण आणि नाशिरभाई पठाण यांना पाळणा थोडा बाजूला घेण्याबाबत सांगितले. यावरून झालेल्या वादातून इब्राहिम पठाण, नाशिर पठाण, परवीन नाशिर पठाण आणि रुकसाना इसमाईल पटेल यांनी महिलेशी हुज्जत घालत शिवीगाळ केली.(Parner Assault Case)
याच वेळी तेथे आलेल्या अरबाज सलीम पटेल, आफ्फान रहेमान पठाण आणि सोहेल शब्दर पठाण यांनी महिला व तिच्या मुलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातील एकाने लोखंडी पाईपने मुलाच्या उजव्या हातावर मारून दुखापत केली, तर नाशिर पठाण यांच्या पत्नीने लोखंडी पाईपने महिलेच्या दोन्ही पायांवर पाठीमागून वार केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या अरविंदभाऊ नावाच्या व्यक्तीलाही संशयितांनी शिवीगाळ करत मारहाण केली.(Parner Assault Case)
पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात इब्राहिम अजिजखान पठाण, नाशिर अजिजखान पठाण, परवीन नाशिर पठाण, रुकसाना इसमाईल पटेल, अरबाज सलीम पटेल, आफ्फान रहेमान पठाण, सोहेल शब्दर पठाण यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अन्वये कलन ११८(१), ११५(२), ३५२, १८९(२), १९१(२), १९१(३), १९० अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Parner Assault Case)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक