अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ आणि नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स यांच्यात वेतन करार

    03-Sep-2026
 
NCPA Wage Agreement
 
मुंबई (अभिनंदन परुळेकर) : NCPA Wage Agreement  भाजप प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघ आणि नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स यांच्यात वेतन करार ४ वर्षांचा ऐतिहासिक वेतन करार करण्यात आला.
 
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले की,“कामगारांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत, त्यांच्या न्याय हक्कांना आणि आर्थिक सुरक्षिततेला बळ देणारा हा ऐतिहासिक करार निश्चितच समाधानाची बाब आहे.” (NCPA Wage Agreement)
 
यानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून रविंद्र चव्हाण यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
 
यावेळी एन. सी. पी. ए.चे चेअरमन खुशरू एन. सुनटूक, डायरेक्टर फ्रेडी तलाठी, टेक्निकल डायरेक्टर नयन काळे, एचआर डायरेक्टर व्हिन्सेंट डिसूझा, भाजपा-प्रणित अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे सरचिटणीस सुहास माटे यांच्यासह संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. (NCPA Wage Agreement)
 
 




संबंधित मजकूर