मुंबईत महिला बचत गट व बँक कर्ज जोडणीवर राष्ट्रीय उच्चस्तरीय बैठक!

    03-Sep-2026

Women SHG Bank Credit Linkage
 
 
मुंबई,(Women SHG Bank Credit Linkage) : ग्रामिण महिलांच्या उद्योजकतेस चालना देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला असून ग्रामीण महिला उद्योजिका आणि स्वयंसाहाय्यता बचत गटांना बँकांकडून वेळेवर व पुरेसा पतपुरवठा मिळताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तसेच कर्जासाठी आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीतील प्रशासकीय विलंब, सीबील स्कोर निकष, बँकांच्या सर्विस एरीया कॉंन्सेप्टमुळे निर्माण होणाऱ्या मर्यादा तसेच कर्जाची अपूर्ण मंजुरी यांसारख्या प्रमुख विषयांवर मार्ग काढण्यासाठी सरकारच्यावतीने मार्गदर्शन केले जाणार आहे.(Women SHG Bank Credit Linkage)
 
यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिला स्वयंसाहाय्यता बचत गटांना बँक कर्जाची प्रभावी जोडणी करून ग्रामीण महिलांच्या उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने मुंबई येथे ‘महिला बचत गट, सूक्ष्म उपक्रम आणि बँक कर्ज जोडणी’ या विषयावर राष्ट्रीय उच्चस्तरीय बैठकीचे नुकतेच आयोजन करण्यात आले.(Women SHG Bank Credit Linkage)
 
केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्री शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्राचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडली.यावेळी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान, केंद्रीय राज्यमंत्री पेम्मासानी चंद्रशेखर, केंद्र सरकारचे ग्रामविकास सचिव रोहित कंसल, महाराष्ट्राच्या ग्रामविकास विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, देशातील विविध राज्यांच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, विविध बँकांचे वरिष्ठ अधिकारी तसेच ‘लखपती दीदी’ यांची विशेष उपस्थिती होती.(Women SHG Bank Credit Linkage)
 
महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कर्ज प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि कालमर्यादित करणे.ग्रामीण भागातील महिलांनी सुरू केलेल्या सूक्ष्म उद्योगांना आवश्यक भांडवल वेळेवर उपलब्ध झाल्यास रोजगारनिर्मितीबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळू शकते, यावर भर देण्यात आला.(Women SHG Bank Credit Linkage)
 
या बैठकीचे आयोजन व व्यवस्थापन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (उमेद) मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे पाटील आणि मुख्य परिचालन अधिकारी निखिल कुमार ओसवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.(Women SHG Bank Credit Linkage)
 
वृक्षारोपणातून महिला सक्षमीकरणाचा संदेश
 
ज्याप्रमाणे योग्य पोषण आणि काळजी मिळाल्यास रोपटे मोठ्या वृक्षात रूपांतरित होते, त्याचप्रमाणे वेळेवर बँक कर्ज, योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक आर्थिक पाठबळ मिळाल्यास ग्रामीण महिलांचे छोटे उद्योग मोठ्या व्यवसायात विकसित होऊ शकतात, हा प्रेरणादायी संदेश देण्यासाठी केंद्रीय व राज्य नेतृत्वासह मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले.(Women SHG Bank Credit Linkage)
 
 




संबंधित मजकूर