सरकारी कर्मचाऱ्यांच्या माहितीचा ‘मास्टर डेटाबेस’; राज्य सरकारचा मोठा निर्णयमाहिती न दिल्यास वेतनाला ब्रेक

    03-Sep-2026   

Master date of government employees
 
 
मुंबई, (Master date of government employees) : राज्य शासनाच्या सेवेतील सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांची अद्ययावत माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष (एम्प्लॉईज मास्टर डेटाबेस) तयार करण्यात येत आहे. त्यासाठी नियमित तसेच अनियमित आस्थापनेवरील कर्मचारी, रोजंदारी, अंशकालीन, मानसेवी आणि तदर्थ तत्त्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्याचे आदेश नियोजन विभागाने दिले आहेत. बुधवारी, याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला.(Master date of government employees)
 
कर्मचाऱ्यांना कोणती माहिती द्यावी लागणार?
 
या माहितीकोषात कर्मचाऱ्यांचे नाव, जन्मदिनांक, लिंग, पदनाम, सेवेत रुजू झाल्याचा दिनांक, निवृत्तीचा दिनांक, भविष्य निर्वाह निधी किंवा भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक, पॅन, आधार क्रमांक, भ्रमणध्वनी क्रमांक, ई-मेल, सामाजिक प्रवर्ग, जात, धर्म, स्वग्राम, दिव्यांगत्व आदी वैयक्तिक व सेवाविषयक माहिती नोंदविण्यात येणार आहे. त्याचबरोबर सध्याचे पद, पदोन्नतीचा दिनांक, आश्वासित प्रगती योजना आणि जुलै २०२६ महिन्याची वेतनाची तपशीलवार माहितीही संकलित केली जाणार आहे.(Master date of government employees)
 
१५ सप्टेंबरपासून माहिती भरण्यास सुरुवात
 
अधिकाऱ्यांना आवश्यक लॉग-इन आयडी व पासवर्ड दि. २ ते १५ सप्टेंबर २०२६ दरम्यान उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर दि. १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन अद्ययावत करून पहिले प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. माहितीतील त्रुटी दूर करून दुसरे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी दि. १ डिसेंबर २०२६ ते २८ फेब्रुवारी २०२७ हा कालावधी देण्यात आला आहे.(Master date of government employees)
 
प्रमाणपत्र नसेल तर वेतन थांबणार
 
या प्रक्रियेत दिरंगाई करणाऱ्या कार्यालयांना आर्थिक परिणामाला सामोरे जावे लागणार आहे. नोव्हेंबर २०२६ चे वेतन देयक सादर करताना माहिती अद्ययावत केल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास नोव्हेंबर महिन्याची वेतन देयके कोषागार कार्यालये पारित करणार नाहीत. तसेच माहितीतील त्रुटी दूर केल्यानंतर मिळणारे दुसरे प्रमाणपत्र फेब्रुवारी २०२७ च्या वेतन देयकासोबत जोडावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास संबंधित वेतन देयकही कोषागारात स्वीकारले जाणार नाही.(Master date of government employees)
 
रिक्त पदांचीही होणार नोंद
 
या माहितीकोषात केवळ कार्यरत कर्मचाऱ्यांचीच नव्हे, तर शासकीय सेवेतील भरलेली आणि रिक्त पदांची माहितीही समाविष्ट केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील विविध शासकीय विभागांमधील मनुष्यबळाचे अधिक अचूक चित्र शासनाला उपलब्ध होण्याची शक्यता आहे.(Master date of government employees)





अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर