मुंबई (₹139 Crore MD Drug Syndicate.) : मुंबई आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्त कारवाई करत १३९ कोटी रुपयांच्या एमडी ड्रग्स तस्करी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत २१ आरोपींना अटक करण्यात आली असून, ६९ किलो ७५ ग्रॅम एमडी ड्रग्स, मोठ्या प्रमाणात रसायने, प्रयोगशाळेची उपकरणे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या रॅकेटचे धागेदोरे प्रयागराज, मुंबई, नालासोपारा, ठाणे, गुजरात आणि इतर राज्यांपर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे.(₹139 Crore MD Drug Syndicate.)
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची सुरुवात दि. २४ जून रोजी नालासोपारा (पूर्व) येथील प्रगती नगर परिसरात झाली. येथे अविनाश उर्फ सोनू लोकनाथ अय्यर आणि रविकांत ओमप्रकाश राम यांना ११२ ग्रॅम एमडी ड्रग्ससह अटक करण्यात आली. चौकशीत मोठ्या ड्रग्स सिंडिकेटचा उलगडा झाल्यानंतर तपास मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा कक्ष-४ कडे सोपविण्यात आला.(₹139 Crore MD Drug Syndicate.)
तपासादरम्यान पोलिसांना गुजरातमधील कच्छ आणि उत्तर प्रदेशातील प्रयागराज जिल्ह्यातील मेजा तहसील परिसरात शेतामध्ये उभारलेल्या शेडमध्ये कथितरीत्या एमडी ड्रग्सची निर्मिती होत असल्याची माहिती मिळाली. प्रयागराज येथील ठिकाणी छापा टाकल्यानंतर पोलिसांनी ५२ किलो ९३२ ग्रॅम एमडी, सुमारे २६० लिटर रसायने तसेच ड्रग्स तयार करण्यासाठी वापरली जाणारी प्रयोगशाळेतील उपकरणे जप्त केली.(₹139 Crore MD Drug Syndicate.)
पोलिसांच्या माहितीनुसार, या कारवाईत आतापर्यंत ६९ किलो ७५ ग्रॅम एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले असून, त्यासोबत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, रसायने आणि उत्पादनासाठी वापरली जाणारी उपकरणेही हस्तगत करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्या २१ आरोपींमध्ये विविध राज्यांतील व्यक्तींचा समावेश आहे. या टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, त्या दृष्टीने तपास सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) यांच्याशीही समन्वय साधला जात असल्याची माहिती आहे.(₹139 Crore MD Drug Syndicate.)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक