मुंबई (Revanth Reddy Ram Shiva Remark) : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी भगवान राम आणि भगवान शिव यांच्याबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. रेवंत रेड्डी यांनी देवतांचेही श्रीमंत आणि गरीब असे वर्गीकरण केल्याचे निदर्शनास आले. श्रीराम हे श्रीमंतांचे देव, तर शिव हे गरीबांचे देव असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, आम्ही (काँग्रेस) भगवान शिवाचे भक्त आहोत, तर भाजप रामाचा भक्त आहे. भाजपने भगवान रामाला ‘चोरले’ आहे. भाजप हा श्रीमंतांचा पक्ष आहे, म्हणूनच ते ‘जय श्रीराम’ म्हणतात, असेही रेवंत रेड्डी यांनी म्हटले.(Revanth Reddy Ram Shiva Remark)
दिल्ली येथे आयोजित ‘प्रतिदिन मीडिया नेटवर्क’च्या ‘द कॉन्क्लेव्ह २०२६’ या कार्यक्रमात रेवंथ रेड्डी यांनी भगवान शिव आणि भगवान श्रीराम यांची तुलना करत वादग्रस्त विधान केले. रेवंत रेड्डी यांनी द्रविड आणि आर्य सिद्धांताचा उल्लेख करत दक्षिण भारतात शिवाची, तर उत्तर भारतात रामाची अधिक पूजा केली जाते, असा दावा केला. भाजपने भगवान रामाला राजकीय प्रतीक बनवले असल्याचा आरोपही त्यांनी केला. सनातन संस्कृतीतील दोन प्रमुख देवतांना ‘श्रीमंत’ आणि ‘गरीब’ अशा श्रेणींमध्ये विभागल्याने रेवंथ रेड्डी यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. (Revanth Reddy Ram Shiva Remark)
रेवंथ रेड्डी यांच्या या वक्तव्यावरून भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री बंदी संजय कुमार यांनी रेवंथ रेड्डी यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “जे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी ‘मुस्लिम म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच मुस्लिम’ असे म्हणतात, ते आता भगवान राम आणि भगवान शिव यांच्यामध्येही राजकीय रेषा आखत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून, ज्या राज्यात वेमुलवाडा येथे ‘दक्षिण काशी’ आणि भद्राचलम येथे ‘दक्षिण अयोध्या’ आहे, तिथे रेवंत रेड्डी यांनी भगवान राम आणि भगवान शिव यांची उत्तर आणि दक्षिण अशा प्रकारे विभागणी करू नये. भगवान शिवाने हलाहल विष प्राशन केले आणि ते नीलकंठ म्हणून ओळखले गेले. आज काँग्रेस स्वतःचे हलाहल तयार करत आहे—जात विरुद्ध जात, उत्तर विरुद्ध दक्षिण आणि आता शिव विरुद्ध राम. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. वाराणसीच्या आध्यात्मिक केंद्रस्थानी कोण आहेत? काशी विश्वनाथ, भगवान शिव. स्वातंत्र्यानंतर वेमुलवाडा येथील भगवान शिवाच्या श्री राजराजेश्वर स्वामी मंदिरात दर्शन घेणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. (Revanth Reddy Ram Shiva Remark)
पुढे ते म्हणाले की, “निवडणुकीच्या काळात लोकांची मते मिळवण्यासाठी तुम्ही देवतांच्या नावाने शपथ घेतल्या होत्या. आता त्याच देवतांचा वापर लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी करत आहात. काल देवता तुमच्या आश्वासनांचे साक्षीदार होते. आज तुम्हाला त्याच देवतांना एका जातीत, एका वर्गात आणि एका भौगोलिक प्रदेशात विभागायचे आहे. आमची हिंदू परंपरा तुमच्या या लज्जास्पद राजकारणाला अतिशय सुंदर उत्तर देते—‘शिवाय विष्णुरूपाय शिवरूपाय विष्णवे। शिवस्य हृदयं विष्णुर्विष्णोश्च हृदयं शिवः॥’ अर्थात, विष्णू शिवाच्या हृदयात आहेत आणि शिव विष्णूच्या हृदयात आहेत. हाच सनातन धर्म आहे. त्यामुळे हिंदूंनी काँग्रेसच्या फूट पाडणाऱ्या राजकारणाला ओळखले पाहिजे. (Revanth Reddy Ram Shiva Remark)
हिंदू श्रद्धेवरील अत्यंत निंदनीय हल्ला
विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी काँग्रेसवर हिंदू समाजात विविध आधारांवर विभाजन करण्याचा आरोप केला. राम आणि शिव यांच्यातही विभाजन निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. रेड्डी यांच्या वक्तव्याबद्दल काँग्रेस नेतृत्वाने माफी मागावी, याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. हिंदू श्रद्धेवरील अत्यंत निंदनीय हल्ला असल्याची टीका विनोद बन्सल यांनी केली आहे. (Revanth Reddy Ram Shiva Remark)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक