‘ट्रिगर 1’च्या निकषात न बसले तरी पीक नुकसानीनुसार मदत देणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेतकऱ्यांना विश्वास

                    
 
 Devendra Fadnavis Drought Relief
 
मुंबई (Devendra Fadnavis Drought Relief) : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ‘ट्रिगर-१’च्या निकषात न बसलेल्या, मात्र प्रत्यक्षात पिकांचे मोठे नुकसान झालेल्या तालुक्यांनाही मदत देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यासाठी ग्राउंड ट्रुथिंग वाढविण्यात येणार असून मंडळ स्तरापर्यंत प्रत्यक्ष पाहणी केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद सांगताना त्यांनी ही माहिती दिली. (Devendra Fadnavis Drought Relief)
 
यंदा पावसाचे स्वरूप असामान्य राहिले आहे. सुरुवातीच्या दोन महिन्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, तर त्यानंतरच्या काळात पावसाने मोठी दडी मारली. त्यामुळे केवळ तांत्रिक निकषांच्या आधारे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी विशेष कार्यप्रणाली निश्चित करण्यात आली आहे. ज्या तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-१’चे निकष पूर्ण होत नाहीत, तसेच ‘ट्रिगर-२’मधील निकषही लागू होत नाहीत अशा ठिकाणी प्रत्यक्ष पिकांची स्थिती तपासून मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाने हा विषय दुष्काळ उपसमितीच्या निदर्शनास आणून दिला असून, उपसमिती त्या-त्या भागातील परिस्थितीचे नियमित निरीक्षण करणार आहे. “तांत्रिक बाबींमुळे प्रत्यक्ष नुकसान झालेला शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये. जिथे खरोखर पीक करपले आहे, मात्र पहिल्या यादीत तालुका आलेला नाही, तिथेही शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis Drought Relief)
 
केवळ तालुका पातळीवरच नव्हे, तर मंडळ स्तरावरही पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एखाद्या मंडळातील सरासरी पर्जन्यमान अधिक असल्यामुळे संपूर्ण तालुक्याची सरासरी वाढत असेल आणि त्यामुळे नुकसानग्रस्त भाग मदतीपासून वंचित राहत असेल, तर अशा परिस्थितीत मंडळनिहाय वस्तुस्थिती तपासली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले. (Devendra Fadnavis Drought Relief)
 
पंचनाम्याची माहिती शेतकऱ्याला मिळणार
 
पीक नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी शेतकऱ्याची स्वाक्षरी बंधनकारक करण्याबाबत विचारले असता, फडणवीस यांनी सांगितले की, प्रक्रिया अनावश्यकपणे प्रतिबंधात्मक होऊ नये. मात्र, पंचनामा कसा झाला याची माहिती शेतकऱ्याला असणे आवश्यक आहे. शेतकरी पंचनामा करण्याच्या वेळी प्रत्यक्ष उपस्थित नसल्यास अशा परिस्थितीत कोणती कार्यपद्धती असावी, याबाबत योग्य निर्णय दुष्काळ उपसमिती घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis Drought Relief)
 
ठाकरे बंधूंच्या आंदोलनावर फडणवीस म्हणाले...
 
एसआयआरच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंकडून ४ ऑक्टोबरला आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. “कोण आंदोलन करत आहे, यावर मी टीका करणार नाही. मात्र, ज्या मुद्द्यावर आंदोलन केले जात आहे, तो मुद्दा किती खरा आहे आणि आंदोलनात दिली जाणारी उदाहरणे किती वस्तुस्थितीवर आधारित आहेत, हे समजून घेणे आवश्यक आहे,” असे फडणवीस म्हणाले. आंदोलन झाल्यानंतर त्यावर योग्य प्रतिक्रिया दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. (Devendra Fadnavis Drought Relief)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर