मुंबई (Kolkata SRFTI Clash) : कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या मेन थिएटर सभागृहात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा कार्यक्रम आयोजिक करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान डाव्या विचारसरणीची विद्यार्थी संघटना स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय)च्या काही जणांना गोंधळ घातल्याचे निदर्शनास आले. या घटनेनंतर इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थी संघटनेने जारी केलेल्या निवेदनात संघाशी संबंधित संस्थेला कार्यक्रम आयोजित करण्याची परवानगी दिल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी सभागृहात गेले होते आणि त्यांनी गोंधळ घातल्याचे मान्य केले. (Kolkata SRFTI Clash)
सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थी संघटनेने म्हटले की, मेन थिएटरमध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा जनजागृती व संघटनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी परवानगी देण्यापूर्वी विद्यार्थी संघटना आणि विद्यार्थ्यांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. निवेदनात पुढे त्यांनी म्हटले की, दुपारी सुमारे २ वाजता काही विद्यार्थी मेन थिएटरमध्ये गेले. विद्यार्थ्यांना माहिती न देता अशा कार्यक्रमाला परवानगी देण्याच्या संस्थेच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणारी पोस्टर्स तेथे लावण्याचा त्यांचा प्रयत्न होता. कार्यक्रमस्थळी उपस्थित ग्राहक पंचायतीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांचा सामना केला आणि त्यांना थिएटरमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर परिस्थिती चिघळली.” (Kolkata SRFTI Clash)
ग्राहक पंचायतीच्या सदस्यांविरोधात एकतर्फी आरोप करण्यात आले असले तरी, या घटनेशी संबंधित व्हिडीओमध्ये डाव्या विचारसरणीचे आंदोलक ग्राहक पंचायतीने लावलेले स्वामी विवेकानंदांचे छायाचित्र असलेले बॅनर फाडताना दिसत आहेत. दरम्यान, पश्चिम बंगाल भाजपने दावा केला की, डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी आंदोलकांनी संघविरोधी घोषणा दिल्या आणि गोंधळ घातला. तसेच त्यांनी भारत माता आणि स्वामी विवेकानंदांची पोस्टर्स फाडल्याचाही आरोप भाजपने केला. (Kolkata SRFTI Clash)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक