मंत्रालयात भरले खादी ग्रामोद्योग उत्पादन प्रदर्शन; विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन

    29-Sep-2026   
 
Khadi Gramodyog Exhibition 2026
 
मुंबई: महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई यांच्या वतीने मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्य सचिव राजेश अग्रवाल, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती रवींद्र साठे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अनबलगन आणि उद्योग विकास आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. (Khadi Gramodyog Exhibition 2026)
 
यावेळी मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. प्रदर्शनातील एका स्टॉलचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात हे प्रदर्शन दि. १ ऑक्टोबर, २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहणार आहे. मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच अभ्यागतांनी या प्रदर्शनास भेट देऊन खादी व ग्रामोद्योग उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. (Khadi Gramodyog Exhibition 2026)
 
या प्रदर्शनात मध संचालनालय, क्राफ्टी आर्च, माई महिला बचतगट, ब्युटी क्वीन बीज – गिफ्टेक्स इंडस्ट्रीज, जीन क्रिएशन, सई लेदर वर्क्स शॉप, कोल्हापूर, औद्योगिक व्यवसाय संस्था, मुंबई, कस्तुरबा सोलर खादी समिती, अमरावती, नागपुरे ड्रायफूड्स, जागृती हळद पावडर, फ्लोरिया नॅचरल्स, ग्लॅमरएक्स इम्पेक्स, निद्रा क्रिएशन, ठाणे आणि मॉर्डन लेदर आर्ट, माथेरान आदी संस्थांच्या उत्पादनांचा समावेश आहे. (Khadi Gramodyog Exhibition 2026)
 
विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री
 
प्रदर्शनात मध संचालनालयाचे ‘मधुबन मध’, खादी वस्त्रे, घरगुती पापड, लोणची, सौंदर्य प्रसाधने, हळद, विविध ड्रायफूडस, कोल्हापुरी चप्पल यांसह विविध खादी व ग्रामोद्योग उत्पादनांची खरेदी करता येणार आहे. महिला बचतगट तसेच ग्रामीण भागातील उद्योजकांनी तयार केलेल्या उत्पादनांनाही या प्रदर्शनातून बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. (Khadi Gramodyog Exhibition 2026)
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर