गुवाहाटीत सरकारवर हल्ला, पंजाबमध्ये समाजाला दोष!

अभिजित दीपकेची डबलढोलकी; महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर दुतोंडी भूमिका उघड

    29-Sep-2026   
                          
 
Abhijit Dipke Women’s Safety
 
मुंबई (Abhijit Dipke Women’s Safety) : 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजित दीपके यांच्या राजकीय दुटप्पीपणावर सध्या तीव्र टीका होत आहे. समान स्वरूपाच्या घटनांवर राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या सोयीनुसार वेगवेगळे निकष लावून राजकीय कथा कशी रचली जाते, याचे उत्तम उदाहरण दीपके यांच्या वक्तव्यातून समोर आले आहे. (Abhijit Dipke Women’s Safety)
 
आसाममधील गुवाहाटी येथे आशिक अली याने एका हिंदू महिलेवर केलेला बलात्कार आणि हत्येच्या जघन्य घटनेनंतर अभिजित दीपके यांनी आक्रमक भूमिका घेतली. सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका यांच्याशी बोलताना दीपके म्हणाले, "पोलीस लोकांना नेहमीच त्रास देतात; मात्र महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न येतो तेव्हा त्यांच्यात तत्परता दिसत नाही. आंदोलनं होऊनही सत्तेच्या खुर्चीवर बसलेल्या एकाही व्यक्तीने याबाबत चकार शब्द काढलेला नाही." आसाममध्ये भाजपचे हिमंता बिस्वा सरमा सरकार सत्तेवर असल्याने दीपके यांनी कायदा-सुव्यवस्थेचा दाखला देत पोलीस आणि सरकारला थेट धारेवर धरले. (Abhijit Dipke Women’s Safety)
 
मात्र, 'आप'ची सत्ता असलेल्या पंजाबमधील लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये बलात्काराची घटना घडल्यानंतर दीपके यांच्या भूमिकेत कमालीचा बदल पाहायला मिळाला. भगवंत मान सरकार किंवा पंजाब पोलिसांच्या अपयशावर एक शब्दही न बोलता त्यांनी सोशल मीडियावर समाजालाच दोषी ठरवत 'आत्मपरीक्षणाचा' सल्ला दिला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर लिहिताना ते म्हणाले, "विद्यापीठाचा परिसर हा महिलांसाठी सुरक्षित असायला हवा. वसतिगृहातही सुरक्षित वाटत नसेल तर ही गंभीर समस्या आहे. २०२६ मध्ये महिलांना सुरक्षेसाठी संघर्ष करावा लागू नये." या संपूर्ण वक्तव्यात त्यांनी पंजाब सरकार किंवा पोलिसांचा उल्लेखही टाळला. (Abhijit Dipke Women’s Safety)
 
त्यानंतर इन्स्टाग्रामवरील एका व्हिडिओमध्ये त्यांनी अधिक बचावात्मक भूमिका घेत म्हटले, "महिलांना रात्री बाहेर पडताना विचार करावा लागत असेल तर आपल्याला लाज वाटली पाहिजे. आपण नंतर पोलीस किंवा सरकारकडे जाऊ... पोलीस किंवा सरकारला दोष देण्यापूर्वी आपण सर्वांनी प्रथम याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे." (Abhijit Dipke Women’s Safety)
 
गुवाहाटी घटनेच्या वेळी सरकार आणि पोलिसांना दोषी ठरावणारे दीपके पंजाबमधील घटनेच्या वेळी मात्र "आधी समाजाची जबाबदारी, मग सरकारची" असा सूर आळवताना दिसले. अभिजित दीपके यांच्या राजकीय प्रवासात आणि प्रसिद्धीत 'आप'चा मोठा वाटा राहिला आहे. शिवाय, सीजेपीच्या प्रवक्त्यांनी पंजाबमधील 'आप' सरकारसाठी 'स्कूल ऑडिट'च्या नावाखाली कथित जनसंपर्क मोहीम राबवल्याच्या घटनेला महिना उलटत नाही तोच दीपके यांनी हे कथानक बदलले. आपल्या राजकीय आकांक्षेपोटी आणि 'आप' सरकारची ढाल बनण्यासाठीच दीपके यांनी महिला सुरक्षेसारख्या गंभीर मुद्द्यावर ही 'डबलढोलकी' भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Abhijit Dipke Women’s Safety)
 
 




ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
संबंधित मजकूर