वर्धा:‘सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचाच आहे,’ या भूमिकेतून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने तयारी सुरू केली असून, अचूक पंचनामे पूर्ण करून एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी वर्धा येथे स्पष्ट केले. केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार स्वतःच्या तिजोरीतून शेतकऱ्यांना मदत करण्याच्या भूमिकेत असल्याचेही त्यांनी सांगितले. (Surgical Strike 10 Years)
वर्धा येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना बावनकुळे म्हणाले की, राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली असून दुष्काळ जाहीर करण्याबरोबरच त्यावरील उपाययोजनांबाबतही निर्णय घेतला आहे. दुष्काळाच्या काळात खरीप आणि रब्बी हंगामासोबतच पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे विकासकामांच्या प्राधान्यक्रमापेक्षा शेतकऱ्यांना मदत करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. (Surgical Strike 10 Years)
दुष्काळाच्या उपाययोजनांसाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यांची मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. राज्य सरकारने मदत जाहीर केली, मात्र संबंधित शेतकऱ्याचा अचूक पंचनामा झाला नाही, तर प्रत्यक्ष मदत देण्यात अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे पंचनाम्याच्या प्रक्रियेला प्राधान्य देण्यात आले आहे. दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकरी आत्महत्येसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी सरकारची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्याचा आहे, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. (Surgical Strike 10 Years)
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वरूपाचे कार्यक्रम अत्यंत कमी खर्चात करावे आणि अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी जमा करावी. राज्यातील उद्योगपती आणि व्यापाऱ्यांनीही मुख्यमंत्री सहायता निधीत जास्तीत जास्त मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. (Surgical Strike 10 Years)
तसेच सीएसआरच्या माध्यमातून जलयुक्त शिवारच्या योजना, जलसंधारणाचे प्रकल्प, साठवण तलाव आणि बंधारे यांची कामे करता येऊ शकतात, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, भूजलपातळी वाढवणे आणि पुढील काळात शेतकऱ्यांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल अशी व्यवस्था उभी करणे, जलसंधारणासोबतच वीजपुरवठ्याशी संबंधित बाबींवरही लक्ष द्यावे लागणार आहे. ही सरकारची प्राथमिकता असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. (Surgical Strike 10 Years)
दुष्काळाच्या नावाने राजकारण न करता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे. सरकारच्या भूमिकेबाबत काही अडचणी किंवा सूचना असतील तर विरोधी पक्षाने त्या मांडाव्यात मात्र शेतकऱ्यांच्या मनात संभ्रम, अनास्था किंवा भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. (Surgical Strike 10 Years)