दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देणार; पंतप्रधान मोदींचा सज्जड इशारा

    28-Sep-2026
 Surgical Strike 10 Years
 
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने दि. २८ आणि २९ सप्टेंबर २०१६ रोजी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या कारवाईला दहा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’मध्ये खास उल्लेख केला. "भारतावर दहशतवादी हल्ला झाला, तर चोख प्रत्युत्तर दिले जाईल,” असा पुनरुच्चारही पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.’ (Surgical Strike 10 Years)
 
२०१६च्या ‘सर्जिकल स्ट्राईक’ला सोमवारी दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला दहशतवादाविरोधातील भारताच्या स्पष्ट भूमिकेचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मध्ये केला. "भारताने दीर्घ काळ दहशतवादी हल्ल्यांचे दुःख सहन केले आहे. ‘सर्जिकल स्ट्राईक’ हा त्या पार्श्वभूमीवर भारताने दिलेला निर्णायक प्रतिसाद होता. ‘सर्जिकल स्ट्राईक’पासून ‘बालाकोट एअर स्ट्राईक’ आणि त्यानंतरच्या ‘ऑपरेशन सिंदूर’पर्यंत भारताने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दहशतवादी भारतावर हल्ले करतील, तर त्यांना चोख प्रत्युत्तर दिले जाईल,” असा संदेश मोदी यांनी यावेळी दिला. (Surgical Strike 10 Years)
 
दि. १३ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांची आणि २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याची आठवणही पंतप्रधान मोदींनी यावेळी करून दिली. (Surgical Strike 10 Years)
 
 




संबंधित मजकूर