मुंबई,(Sharad Pawar NCP Merger) : आम्ही कुणासोबत जाणार नाही, यायचे असेल तर आमच्यासोबत या, अशी भूमिका जेष्ठ नेते शरद पवार यांनी मांडली आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण आणि शरद पवार गट एनडीसोबत जाणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.(Sharad Pawar NCP Merger)
सोमवारी, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक पार पडली. यावेळी सध्या राज्यातील दुष्काळ निवारणासाठी काय करता येईल, यावर चर्चा झाली. दरम्यान, याप्रसंगी त्यांनी आपण एनडीएसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मागच्या काही दिवसांपासून शरद पवार एनडीएसोबत जाणार असून सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना आणखी जोर आला. मात्र, आता स्वत: शरद पवार यांनीच यावर स्पष्टीकरण दिल्याने या चर्चांवर पडदा पडला आहे.(Sharad Pawar NCP Merger)
शरद पवार म्हणाले की, "मघाशी बोलत असताना प्रांताध्यक्षांनी एक वाक्य वापरले. ते बोलता बोलता म्हणाले की, आपल्यामध्ये काही उलटसूलट चर्चा आहेत. पण पक्षाचा प्रमुख म्हणून मी सांगतो की, ज्या चर्चा सुरु आहेत त्या म्हणजे शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही शक्तीशाली करणार आहोत. बाकीच्या संघटना आमच्या जवळ आल्यात त्यांना यायचे असेल तर त्यांनी आमच्यात यावे. आम्ही कुणाच्यात जाणार नाही. आम्ही आमचा पक्ष मजबूत करणार आहे," असे म्हणत त्यांनी विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.(Sharad Pawar NCP Merger)
दुष्काळासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, "राज्यात सध्या दुष्काळाची परिस्थिती असून त्याविषयी सरकारने एक शासन निर्णय जारी केला आहे. पण मला त्यात काही कमतरता दिसते. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना काही मागण्यांचे एक पत्र दिले. या पत्राचा विचार करून सरकार काही निर्णय घेतील, अशी अपेक्षा आहे. हा निर्णय महाराष्ट्रापुरता सिमित नसून काही निर्णय दिल्लीत होतात. २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. बाकी जिल्हे त्यात नाहीत. केळी पिकाला मदत नाही. याबाबत नोंद घेणे गरजेचे आहे. सरकारने २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला तर, काही तालुके यातून सुटले. हे तालुके का बाकी ठेवलेत? गरीब, शेतमजूर, आदिवासी, छोटे शेतकरी यांना आधार द्यायचा की, नाही? केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या जीआरमध्ये अधिक सुधारणा व्हाव्या, यासाठी आम्ही राज्य सरकारला पत्र दिले आहे. या दोन ते चार दिवसांत आम्ही सरकारडे जाऊन याबाबतचा आग्रह करू," असेही ते म्हणाले. (Sharad Pawar NCP Merger)