ठाणे: डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवरील मारहाण प्रकरणात शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मोठा दणका दिला. ‘मेडिकल फ्रॅटर्निटीला हात लावता कामा नये. ते लोकांची सेवा करतात आणि अशा प्रकारे त्यांच्यावर हल्ला करता येणार नाही,’ असा स्पष्ट संदेश देत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाने म्हात्रे यांना मंजूर केलेला जामीन रद्द केला असून म्हात्रे यांना तीन दिवसांच्या आत आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत. (Ramesh Mhatre Bail Cancelled)
न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर महाराष्ट्र सरकारच्या जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर सुनावणी झाली. राज्य सरकारची याचिका सुनावणीसाठी दाखल करून घेताना खंडपीठाने डॉक्टरांवरील हल्ल्यांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याचा स्पष्ट संदेश दिला. ‘मेडिकल फ्रॅटर्निटीला हात लावता कामा नये; हा संदेश मोठ्याने आणि स्पष्टपणे समाजात गेला पाहिजे,’ असे न्यायालयाने नमूद केले. (Ramesh Mhatre Bail Cancelled)
तीन दिवसांत आत्मसमर्पणाचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर म्हात्रे यांना तीन दिवसांच्या आत आत्मसमर्पण करावे लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने ७ ऑगस्ट रोजी म्हात्रे यांना काही कठोर अटींसह जामीन मंजूर केला होता. राज्य सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आज सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा जामीन आदेश स्थगित केला. (Ramesh Mhatre Bail Cancelled)
‘डॉक्टरांवर अशा पद्धतीने हल्ला सहन केला जाणार नाही’
डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर रुग्णालयातच हल्ले होत असतील तर त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य रुग्णांवर होतो, अशी भूमिका सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणातून स्पष्ट झाली. यापूर्वी १ सप्टेंबरच्या सुनावणीतही सर्वोच्च न्यायालयाने डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना जामीन देण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली होती. (Ramesh Mhatre Bail Cancelled)
राजकीय हेतूने गुन्हे दाखल केल्याचा म्हात्रेंचा दावा
म्हात्रे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सिद्धार्थ दवे यांनी बाजू मांडली. या प्रकरणातील दोन साक्षीदारांची साक्ष पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. तक्रारदार महिला डॉक्टरांची साक्ष ३ ऑक्टोबरला होणार असून, खटला सुरू झाला आहे आणि त्यात कोणताही अडथळा निर्माण झालेला नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.दरम्यान, म्हात्रे यांच्याविरोधात सध्याच्या प्रकरणासह १९ गुन्हे दाखल असल्याचे खंडपीठाने सुनावणीदरम्यान निदर्शनास आणले. यावर बचाव पक्षाने हे सर्व गुन्हे राजकीय हेतूने दाखल झाल्याचा दावा करत १८ प्रकरणांत म्हात्रे निर्दोष सुटल्याचे न्यायालयाला सांगितले. (Ramesh Mhatre Bail Cancelled)
डॉक्टरांवरील हल्ल्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट इशारा
या प्रकरणाच्या आधीच्या सुनावण्यांमध्येही सर्वोच्च न्यायालयाने रुग्णालयात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत कठोर भूमिका घेतली होती. १ सप्टेंबर रोजी न्यायालयाने अशा व्यक्तींना रस्त्यावर मोकळे फिरू देण्याबाबतही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आजच्या सुनावणीत ‘मेडिकल फ्रॅटर्निटीला हात लावता कामा नये’ हा संदेश अधोरेखित करत म्हात्रे यांचा जामीन स्थगित करण्यात आला.त्यामुळेच डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणाला आता सर्वोच्च न्यायालयाच्या या कठोर भूमिकेमुळे नवे वळण मिळाले असून, म्हात्रे यांना तीन दिवसांत आत्मसमर्पण करावे लागणार आहे. (Ramesh Mhatre Bail Cancelled)
शिवसेनेचा भूमिकेकडे आता लक्ष
डोंबिवली शास्त्रीनगर डॉक्टर मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कठोर भूमिका घेतल्याने आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे..पालघर मधील घटने नंतरही सर्वोच्च न्यायालयाने त्या घटनेचा उल्लेख करत कडक ताशेरे ओढले होते..त्यानंतर तात्काळ पालघर शहर प्रमुखाची थेट हकालपट्टी करण्यात आली होती..मात्र रमेश म्हात्रेंबाबत शिवसेना वेगळं न्याय लावत आहे का? थेट सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दांत सूनवुनही म्हात्रे यांची हकालपट्टी का करण्यात येत नाही याबाबत आता अनेक चर्चा कल्याण डोंबिवली मध्ये सुरू आहेत..त्यामुळे रमेश म्हात्रे यांची पक्षातून हकालपट्टी करणार का याकडे कल्याण डोंबिवली करांचे लक्ष लागून राहिले आहे. (Ramesh Mhatre Bail Cancelled)