मुंबई : एसटी महामंडळाच्या विविध सवलत योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना एनसीएमसी कार्ड सक्तीचे केले आहे. याच पार्श्वभूमीवर रविवार दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी जोगेश्वरी येथे एनसीएमसी कार्ड वितरण शिबीर आयोजित करण्यात आले. (Jogeshwari NCMC Card Camp)
एसटी प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना मिळणाऱ्या विशेष सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी १ ऑक्टोबरपासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. सर्वसामान्य नागरिक या सवलतींपासून वंचित राहू नये. महाराष्ट्रातील सर्व महिला आणि ज्येष्ठ नागरिक या योजनेस पात्र ठरून तिकीट दरात ५० ते ७५ % सवलत मिळावी. या उद्देशाने, (Jogeshwari NCMC Card Camp)
जोगेश्वरी पूर्वेकडील सर्वोदयनगर येथे रामरत्न प्रतिष्ठान आणि श्री हनुमान साई सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एमएचबी काॅलनी येथे एकदिवसीय विशेष शिबीर भरवण्यात आले होते. या शिबीराला परिसरातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. (Jogeshwari NCMC Card Camp)
सर्वोदयनगर येथील साईबाबा मंदिर आणि शांतादुर्गा गावदेवी माता मंदिर या दोन ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराला संपूर्ण दिवसभर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. रामरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र परब, मंगेश मोरे, श्री हनुमान साई सेवा मंडळाचे दर्शन राणे, अमित राणे, अक्षय कुवळेकर, सोहम रावराणे, दिपक कोदे, बिपीन म्हापुसकर, नरेश लोटणकर यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. (Jogeshwari NCMC Card Camp)