मुंबई: आंतरराष्ट्रीय सागरी तट स्वच्छता सप्ताहाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यंदाही चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि सागरी सीमा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई पश्चिम उपनगरातील प्रसिद्ध अक्सा व मार्वे बीच येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या 'स्वच्छ भारत अभियाना'च्या प्रेरणेतून समुद्रकिनारे स्वच्छ व सुंदर राखण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या अभियानात फाऊंडेशनचे २०० हून अधिक स्वयंसेवक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले होते. (Aksa Marve Beach Clean-Up Drive)
अनंत चतुर्दशीनंतर समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात निर्माल्य, प्लास्टिक, सजावटीचे साहित्य, आणि मूर्तींचे अवशेष आढळतात. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांचे सौंदर्य तर खराब होतेच, पण समुद्री जीवसृष्टी आणि पाण्याच्या गुणवत्तेवरही परिणाम होऊ शकतो. निसर्गाचा ऱ्हास टाळण्यासाठी वेळोवेळी स्वच्छता करणे गरजेचे आहे.(Aksa Marve Beach Clean-Up Drive)
२ ट्रॉलीहून अधिक कचऱ्याचे संकलन
स्वयंसेवकांनी अक्सा आणि मार्वे बीचवरील प्लास्टिक, कागद व इतर टाकाऊ वस्तू एकत्र करून २ ट्रॉलीहून अधिक कचरा गोळा केला. संकलित केलेला कचरा पुढील प्रक्रियेसाठी मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आला.(Aksa Marve Beach Clean-Up Drive)
प्रमुख उपस्थितांची नोंद
या स्वच्छता अभियानात अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. भाजप जिल्हाध्यक्ष दीपक बाळा तावडे आणि उपाध्यक्ष शरद साटम.
चारकोप कल्चरल अँड स्पोर्ट्स फाऊंडेशन- अध्यक्ष सुनील अंकम, सचिव संदीप कदम, उपाध्यक्ष सचिन नायक, जयश्री गाणात्रा, राज त्रिवेदी, अजित डोंगरे, शिवाजी शेट्टी, बालराज डुबक
सागरी सीमा मंच- दुर्गेश बोराडे, जयंत चव्हाण, मोहित, चंदू म्हात्रे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते
"अनंत चतुर्दशीनंतर आयोजित केलेल्या या स्वच्छता अभियानामुळे अक्सा व मार्वे बीच पुन्हा एकदा अत्यंत स्वच्छ आणि सुंदर दिसू लागले आहेत."(Aksa Marve Beach Clean-Up Drive)