उज्जैन (Ujjain Shahi Masjid Stone Pelting) : मध्य प्रदेशातील उज्जैन येथे सोमवार, दि. २८ सप्टेंबर शाही मशिदीचा काही भाग हटवण्याच्या कारवाईदरम्यान तणावाची परिस्थिती निर्माण झाली. छत्री चौक ते गोपाल मंदिर या मार्गावरील रस्ता रुंदीकरणासाठी मशिदीचा बाधित भाग हटवण्याची प्रक्रिया सुरू असताना काही लोकांनी विरोध केला. यावेळी दगडफेक आणि घोषणाबाजी करण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या व लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेत क्राइम ब्रँचच्या निरीक्षक पुष्पा पांचाळ यांच्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
रस्ता रुंदीकरणाच्या कारवाईला विरोध
उज्जैनमध्ये २०२८ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. छत्री चौक ते गोपाल मंदिर या मार्गावरील रस्ता रुंद करण्यासाठी शाही मशिदीचा काही भाग अडथळा ठरत होता. त्यामुळे हा भाग हटवण्याची कारवाई प्रशासनाकडून सुरू करण्यात आली. (Ujjain Shahi Masjid Stone Pelting)
मशिदीचे व्यवस्थापन आणि उज्जैन महानगरपालिका यांच्यात या कारवाईबाबत सहमती झाल्यानंतर समाजातील काही लोकांनी स्वतःहून मशिदीचा बाधित भाग हटवण्यास सुरुवात केली. मात्र, या कारवाईदरम्यान काही लोकांनी विरोध करत घोषणाबाजी केली. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
#WATCH | Madhya Pradesh: Police use tear gas shells to control a crowd in Ujjain as stone pelting occurred when a large group of people clashed with them at the spot where a portion of Shahi Masjid is planned to be demolished for a road-widening project. Rapid Action Force (RAF)… pic.twitter.com/zRLlSzgXoj
उज्जैन विकास आराखडा २०३५ अंतर्गत १५ मीटर रुंद रस्ता तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रस्तावित रस्त्याच्या मार्गात शाही मशिदीचा काही भाग येत असल्याने उज्जैन महापालिकेने तो हटवण्यासाठी नोटिसा बजावल्या होत्या. (Ujjain Shahi Masjid Stone Pelting)
ही मशीद वक्फ मालमत्ता म्हणून नोंदणीकृत आहे. मशिदीच्या व्यवस्थापनाशी संबंधित याचिकाकर्त्यांनी महापालिकेच्या नोटिसांना न्यायालयात आव्हान दिले होते. प्रस्तावित कारवाईमुळे मशिदीच्या नमाजगृहाचा काही भाग, मिनार आणि ‘मजार चौक शाही’ या भागांवर परिणाम होणार असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.
Tensions erupted in Ujjain over a plan to remove part of a mosque.
Protests broke out over the proposed removal of a portion of the Shahi Mosque.
The dispute is linked to a road-widening project in Ujjain.
कारवाईदरम्यान परिस्थिती चिघळल्यानंतर काही लोकांकडून दगडफेक करण्यात आले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यावेळी काही महिलांनी रस्त्यावर ठिय्या देत कारवाईला विरोध केला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. (Ujjain Shahi Masjid Stone Pelting)
या घटनेत क्राइम ब्रँचच्या निरीक्षक पुष्पा पांचाळ यांच्या हाताला दुखापत झाली. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. दगडफेक आणि शांतता भंग केल्याप्रकरणी १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात दोन हजारांहून अधिक पोलिस तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात येते. प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी खबरदारी घेण्यात आली. धार्मिक स्थळाच्या परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था अधिक कडक केली. (Ujjain Shahi Masjid Stone Pelting)
उच्च न्यायालयाने घेतली समझोत्याची नोंद
दरम्यान, शाही मशिदीचा काही भाग हटवण्याच्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेवर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने सोमवार दि. २८ सप्टेंबर सुनावणी घेतली. मशिदीचे व्यवस्थापन आणि उज्जैन महानगरपालिका यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेची न्यायालयाने नोंद घेतली. (Ujjain Shahi Masjid Stone Pelting)
सिंहस्थ कुंभमेळा २०२८ च्या तयारीचा भाग म्हणून उज्जैनमध्ये रस्ते रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान धार्मिक स्थळांच्या बाधित भागांबाबत प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. शाही मशिदीच्या परिसरातील घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. (Ujjain Shahi Masjid Stone Pelting)
Hello, You must be familiar with the Nation First approach daily 'Mumbai Tarun Bharat' as a newspaper committed to fearless and nationalist ideals and constantly doing conscious journalism for it. The journey of four decades has been successful only because of your trust and cooperation. Dear readers, we have been making a successful effort to always be perfect in our commitment to the thoughts of the nation and the national interest...
Changing with time is essential for any organization. Daily 'Mumbai Tarun Bharat' has decided to take this role here too and make 'MahaMTB' available in the media for the new 'smart' generation. Today's youth, readers, and citizens are becoming more and more 'smart' day by day. And in today's 'smart' era, information is available in abundance in the Internet-enabled information explosion. However, there is a need for complementary knowledge to determine a modern role and approach that is compatible with culture, motionlessness and tradition.
That is why mahamtb.com, MahaMTB Mobile App', MahaMTB Youtube Channel, MahaMTB Facebook Page, MahaMTB Twitter, MahaMTB Instagram, MahaMTB Telegram, MahaMTB WhatsApp Group etc. through social media and advanced avatar content. We are coming before you. Role in the new era, 'smart' journalism with a view, 'smart' multimedia for the new era, and journalism for a 'smart' Maharashtra will be the side of the game.