मुंबई (SIR Row Fadnavis Rahul Gandhi): निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण प्रक्रियेवरून (SIR) सुरू असलेल्या राजकीय वादाला आता आणखी धार आली आहे. राहुल गांधी संविधान हातात घेऊन संवैधानिक संस्थांबाबत जनतेच्या मनात संशय निर्माण करण्याचे काम करत आहेत, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींवर फडणवीस यांनी जोरदार टीका केली. (SIR Row Fadnavis Rahul Gandhi)
निवडणूक आयोगाच्या तीनही आयुक्तांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेकडे लक्ष वेधत फडणवीस म्हणाले की, SIRसह सर्व निर्णय एकमताने झाले आहेत. आयोगातील निर्णयप्रक्रियेत कोणताही मतभेद नसल्याचे तीनही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आयोगातील कथित मतभेद आणि SIRच्या निर्णयावरून निर्माण करण्यात येत असलेल्या संभ्रमावर फडणवीस यांनी प्रश्न उपस्थित केले. (SIR Row Fadnavis Rahul Gandhi)
राहुल गांधींची रणनीती संवैधानिक संस्थांवरील लोकांचा विश्वास कमी करण्याची असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. निवडणूक आयोगाबरोबरच सर्वोच्च न्यायालय, रिझर्व्ह बँक आणि CAG यांसारख्या संस्थांवरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेले संविधान इतके कमजोर आहे का की त्याने निर्माण केलेल्या संवैधानिक संस्था संपुष्टात येतील?”, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. (SIR Row Fadnavis Rahul Gandhi)
“व्हेन यू कॅनॉट कन्विन्स पीपल, कन्फ्युज देम” या शब्दांत फडणवीस यांनी राहुल गांधींच्या भूमिकेवर टीका केली. जनतेला आपल्या भूमिकेबाबत पटवून देता येत नसल्याने संवैधानिक व्यवस्थेबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. (SIR Row Fadnavis Rahul Gandhi)
मतदारयादी आणि SIR प्रक्रियेवरून राहुल गांधींकडून उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर फडणवीस यांनी राजकीय पक्षांच्या भूमिकेवरही बोट ठेवले. प्रत्येक राजकीय पक्षाला बूथ लेव्हल एजंटच्या माध्यमातून मतदारयादी तपासण्याची आणि चुकीच्या नोंदींवर आक्षेप घेण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याऐवजी राजकीय पक्षांनी प्रत्यक्ष प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे ते म्हणाले. (SIR Row Fadnavis Rahul Gandhi)
SIRमध्ये मोठ्या प्रमाणात मतदार कमी झाल्याचा दावा केला जात असताना, अशा मतदारसंघांमध्ये तृणमूल काँग्रेस विजयी झाल्याचा दाखला फडणवीस यांनी दिला. जर SIRमध्ये केवळ भाजपविरोधी मतदारांची नावे वगळण्यात आली असतील, तर अशा मतदारसंघांमध्ये विरोधी पक्ष विजयी कसा झाला?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (SIR Row Fadnavis Rahul Gandhi)
मतदारयादीतील नावे वगळली जात असल्याच्या आरोपांवर फडणवीस यांनी प्रत्येक पक्षाला आक्षेप नोंदवण्याची संधी असल्याचे सांगितले. BLAच्या माध्यमातून मतदारयादीतील प्रत्येक नावावर आक्षेप घेता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले. (SIR Row Fadnavis Rahul Gandhi)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.