दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला डावखरेंचा मदतीचा हात

माथाडी कामगार मेळाव्यात आमदार निरंजन डावखरेंकडून मुख्यमंत्री फडणवीसांकडे धनादेश सुपूर्द

    27-Sep-2026
          
 
Niranjan Davkhare CM Relief Fund
  
ठाणे : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मदतीसाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदतीचा हात दिला. तुर्भे येथे मराठा क्रांतीसूर्य स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या ९३व्या जयंतीनिमित्त आयोजित गुणवंत कामगार पुरस्कार वितरण व माथाडी कामगार मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे डावखरे यांनी मदतीचा धनादेश सुपूर्द केला. (Niranjan Davkhare CM Relief Fund)
 
राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी, कष्टकरी आणि संकटग्रस्त नागरिकांना मदत मिळावी, या उद्देशाने हा निधी देण्यात आला. यावेळी ठाणे महापालिकेचे नगरसेवक भरत चव्हाण यांच्या वतीनेही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी धनादेश मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. (Niranjan Davkhare CM Relief Fund)
 
नैसर्गिक संकटाच्या काळात केवळ सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी प्रत्येकाने आपल्या परीने योगदान देणे ही सामाजिक जबाबदारी आहे. संकटग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका लोकप्रतिनिधींनीही जपली पाहिजे, अशी भूमिका डावखरे यांनी यावेळी व्यक्त केली. (Niranjan Davkhare CM Relief Fund)
 
वाढदिवस साजरा न करता भाजप नगरसेवक भरत चव्हाण यांची दुष्काळग्रस्तांना मदत..
 
राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात म्हणून ठाण्यातील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी वाढदिवस साजरा न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी मदतीचा धनादेश प्रदान केला. राज्यातील शेतकऱ्यांवरील दुष्काळाच्या संकटात आम्ही कायम दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी राहू. तसेच भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सेवाभावी संस्थानीही दुष्काळग्रस्तांना मदत द्यावी, असे आवाहन नगरसेवक भरत चव्हाण व भाजयुमोचे प्रदेश चिटणीस ओमकार चव्हाण यांनी केले आहे. (Niranjan Davkhare CM Relief Fund)
 
 




संबंधित मजकूर