मुंबई (Asiatic Society Election 2026) : ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या एशियाटिक सोसायटीच्या व्यवस्थापन समितीच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी पार पडलेल्या निवडणुकीत 'एशियाटिक टुमारो' पॅनेलने ऐतिहासिक आणि दणदणीत विजय मिळवला आहे. शनिवार, २६ सप्टेंबर रोजी सोसायटीच्या २२२ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर हे मतदान पार पडले.
या निवडणुकीत व्यवस्थापन समितीच्या ५ जागांसाठी एकूण १० उमेदवार रिंगणात होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत 'एशियाटिक टुमारो' पॅनेलने प्रतिस्पर्धी उमेदवारांना पराभवाची धूळ चारत पाचही जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. (Asiatic Society Election 2026)
या निवडणुकीत विप्लव वेलेल, नॉबी परियारम, संदीप दहिसरकर, शर्मिष्ठा मुखर्जी आणि योगेश शाह हे अन्य उमेदवार प्रतिस्पर्धी म्हणून रिंगणात होते, मात्र मतदारांनी 'एशियाटिक टुमारो' पॅनेलच्या ध्येयधोरणांना आणि नेतृत्वाला कौल दिला. (Asiatic Society Election 2026)
डॉ. मुणगेकर यांच्याकडून वंदे मातरम् चा अवमान!
गेल्या २२२ वर्षात एशियाटिक सोसायटीची सर्वसाधारण सभेची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. समारोप संपूर्ण वंदे मातरम् ने झाला. मात्र या राष्ट्रीय गीताची सुरुवातीची दोन कडवी संपल्यावर सोसायटीच्या बोर्ड ऑफ ट्रस्टीचे चेअरमन, माजी कुलगुरू व खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर तिथून निघाले. त्यांच्या या कृतीमुळे अनेक सदस्य थक्क झाले. (Asiatic Society Election 2026)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक