मुंबई: राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने त्याचा फटका शेतीबरोबरच मत्स्यव्यवसायालाही बसला आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. तलावांमधील पाणीसाठा, मत्स्यव्यवसायाची स्थिती आणि मच्छीमारांचे झालेले नुकसान याची ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. (Nitesh Rane Fisheries Visit)
राणे यांच्या दौऱ्याची सुरुवात सकाळी १० वाजता कन्नड तालुक्यातील शिवणटाकळी तलावाच्या पाहणीने होणार आहे. यावेळी स्थानिक मच्छीमारांशी संवाद साधून दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणी, व्यवसायावर झालेला परिणाम आणि नुकसानीची माहिती घेतली जाणार आहे. (Nitesh Rane Fisheries Visit)
यानंतर मंत्री राणे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात पोहोचतील. दुपारी १२.३० वाजता राजेवाडी तलावाची, तर १.१५ वाजता सोमाठणा तलावाची पाहणी करण्यात येणार आहे. या ठिकाणीही स्थानिक मच्छीमारांशी संवाद साधून मत्स्यव्यवसायासमोरील प्रश्नांचा आढावा घेतला जाणार आहे. (Nitesh Rane Fisheries Visit)
दौऱ्याचा समारोप दुपारी ३.३० वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीने होणार आहे. शासकीय अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या या बैठकीत दुष्काळसदृश परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर झालेला परिणाम, तलावांची सद्यस्थिती आणि नुकसानग्रस्त मच्छीमारांच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा होणार आहे. प्रत्यक्ष पाहणी, मच्छीमारांशी संवाद आणि प्रशासनासोबत आढावा या त्रिसूत्रीतून नुकसानग्रस्त मच्छीमारांना मदत व आवश्यक उपाययोजनांची दिशा निश्चित करण्याचा प्रयत्न या दौऱ्यातून होणार आहे. (Nitesh Rane Fisheries Visit)