महामार्गांच्या विकासाला तंत्रज्ञानाची गती! एनएचएआयच्याच्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांत एआय, वृक्षारोपण अन् जलव्यवस्थापनावर भर

       
 
   NHAI Highway Guidelines
 
नवी दिल्ली  (NHAI Highway Guidelines) : देशातील अतिवेगवान नियंत्रित प्रवेश असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या विकासाला आता तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक नियोजनाची जोड मिळणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) द्रुतगती महामार्ग वगळता चार आणि सहा पदरी ‘हाय स्पीड ॲक्सेस कंट्रोल्ड’ राष्ट्रीय महामार्गांच्या नियोजन आणि डिझाइनसाठी सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यामुळे भविष्यातील राष्ट्रीय महामार्ग अधिक सुरक्षित, सक्षम आणि शाश्वत करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे.
(NHAI Highway Guidelines)
 
नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महामार्गांची क्षमता ठरवताना केवळ सध्याच्या वाहतुकीचा विचार न करता भविष्यातील वाहतूकवाढीचाही अंदाज घेतला जाणार आहे. इतर मार्गांवरून वळणारी वाहतूक, वाढते आर्थिक-व्यावसायिक उपक्रम आणि मालवाहतुकीतील संभाव्य वाढ यांचा विचार करून महामार्गांचे नियोजन केले जाणार आहे. (NHAI Highway Guidelines)
 
महामार्ग बांधकामाची गुणवत्ता आणि अचूकता वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. तटबंदी आणि रस्त्याच्या पृष्ठभागाच्या कामात ‘इंटेलिजंट मशीन-असिस्टेड कन्स्ट्रक्शन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे बांधकाम प्रक्रियेत अचूकता, कार्यक्षमता आणि देखरेख वाढण्याची अपेक्षा आहे. (NHAI Highway Guidelines)
 
महामार्ग म्हणजे केवळ डांबरी रस्ता नव्हे, तर त्याभोवतालच्या पर्यावरणाचाही विचार करणारी पायाभूत सुविधा, अशी भूमिका नव्या मार्गदर्शक तत्त्वांतून स्पष्ट होते. वळणमार्ग, उड्डाणपुलांखालील जागा, दुभाजक आदी ठिकाणी स्थानिक हवामान व भौगोलिक परिस्थितीनुसार वृक्षारोपण आणि लँडस्केपिंगचे नियोजन केले जाणार आहे. (NHAI Highway Guidelines)
 
पावसाच्या पाण्याचा निचरा आणि जलव्यवस्थापनाला डीपीआरमध्येच महत्त्व दिले जाणार आहे. नैसर्गिक निचरा नसलेल्या भागांत जलसंधारणाच्या सुविधा उभारल्या जातील. रस्त्याखालील मार्ग, उड्डाणपूल आणि सखल दुभाजकांजवळही विशेष जलव्यवस्था केली जाणार आहे. त्यामुळे पाणी साचणे आणि महामार्गाच्या पायाभूत सुविधांचे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे. नवे महामार्ग वेगासोबत सुरक्षितता, तंत्रज्ञान आणि पर्यावरणाचा समतोल साधणारे करण्याचा एनएचएआयचा प्रयत्न आहे. (NHAI Highway Guidelines)
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर