उल्हासनगर (Ulhasnagar Nominated Corporator Election): उल्हासनगर महानगरपालिकेच्या एकूण ७ स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडीसाठी राजकीय घडामोडींना जोरदार उधाण आले आहे. पालिका सभागृहातील पक्षीय संख्याबळानुसार या ७ जागांपैकी भाजपच्या कोट्यात ४ तर शिवसेनेच्या कोट्यात ३ स्वीकृत नगरसेवक येत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी भाजपच्या चारही उमेदवारांची निवड निश्चित मानली जात आहे. (Ulhasnagar Nominated Corporator Election)
मनपा सचिव कार्यालयात २२ सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी व स्वीकृती प्रक्रिया पार पडली असून, येणाऱ्या २४ सप्टेंबर रोजी या निवडणुकीची औपचारिक प्रक्रिया पार पडणार आहे. एकूण ७ जागांसाठी तब्बल ४१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. (Ulhasnagar Nominated Corporator Election)
संख्याबळाच्या जोरावर भाजपच्या कोट्यातील ४ जागांवर धनंजय बोडारे, बाळा श्रीखंडे, कपिल अडसूळ आणि प्रदीप रामचंदानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पुरेसे संख्याबळ पाठीशी असल्याने या चारही नेत्यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. (Ulhasnagar Nominated Corporator Election)
दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडे ३ स्वीकृत नगरसेवकांचा कोटा उपलब्ध आहे. मात्र, शिवसेना, साई पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचा समावेश असलेल्या 'उल्हासनगर शहर विकास आघाडी'कडून अनेक इच्छुकांनी अर्ज भरले आहेत. यात पंचम ओमी कालानी, मनोज लासी, तिरुपती रेड्डी, प्रमोद टाले, रमेश चव्हाण, आशा पांडू पवार, मनिषा भानुशाली, डॉ. प्रकाश नाथानी, रुपाली विशाल म्हस्के, किशोर वनवारी, अंकुश म्हस्के, रेशमा नवले, निलेश बोबडे, हेमा पिंजाणी, सुरेश सोनावणे, भरत गंगोत्री, राजकुमार शर्मा, सुरेंद्र बाळकृष्ण सावंत, जीवन ईद्नानी, हरेश ईद्नानी आणि जनक ईद्नानी यांचा समावेश आहे. शिवसेनच्या ३ जागांवर पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Ulhasnagar Nominated Corporator Election)
या संपूर्ण प्रक्रियेत भाजपच्या हेमा पिंजानी यांनी घेतलेली भूमिका विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. पिंजानी यांनी यापूर्वी भाजपकडून उमेदवारी मिळवून नगरसेवक पदाची निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपने स्वीकृत नगरसेवकांसाठी आपली अधिकृत यादी जाहीर करताना त्यांना डावलल्याने, त्यांनी ऐनवेळी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शिवसेना त्यांना आपल्या ३ जागांच्या कोट्यातून संधी देते का, याविषयी स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. (Ulhasnagar Nominated Corporator Election)