राज्यातील विद्यापीठांमध्ये भरणार विद्यार्थी मराठी साहित्य संमेलन

    23-Sep-2026   
 
 
 Student Marathi Literature Conferences
 
मुंबई (Student Marathi Literature Conferences): १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सार्वजनिक विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित तसेच अभिमत विद्यापीठांमध्ये एकदिवसीय विद्यार्थी मराठी साहित्य संमेलने आयोजित करावी, अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. या संमेलनांमध्ये युवा विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग राहील, यासाठी विद्यापीठांनी विशेष नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले. (Student Marathi Literature Conferences)
 
मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसंदर्भात राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंसमवेत ऑनलाइन बैठक घेण्यात आली. यावेळी मराठी भाषा मंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, मराठी भाषा विभागाचे अधिकारी तसेच विद्यापीठाचे कुलगुरू (ऑनलाइन) उपस्थित होते. (Student Marathi Literature Conferences)
 
दि. २८ जानेवारी २०२७ ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत पुणे येथे १०० वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. या संमेलनाचे औचित्य साधून राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये विद्यार्थी मराठी साहित्य संमेलने आयोजित करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या माध्यमातून मराठी भाषेचा प्रसार आणि साहित्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये अधिक रुची निर्माण होण्यास मदत होईल. सर्व विद्यापीठांनी ही संमेलने एकाच दिवशी न घेता वेगवेगळ्या तारखांना आयोजित करावीत, जेणेकरून विविध ठिकाणी होणाऱ्या साहित्यविषयक उपक्रमांना व्यापक स्वरूप प्राप्त होईल, अशा सूचना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. (Student Marathi Literature Conferences)
 
‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ उपक्रमाचे आयोजन
 
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये ३ ते १३ ऑक्टोबरदरम्यान ‘अभिजात मराठी, अभिमान मराठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. (Student Marathi Literature Conferences)
 
 
 




अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
संबंधित मजकूर