सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी

कठोर कारवाईचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

    23-Sep-2026
   
Bombay High Court Firecracker Ban   
मुंबई: धार्मिक सण, उत्सव आणि मिरवणुकांदरम्यान होणार्‍या ध्वनी व वायुप्रदूषणाची मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. ध्वनिप्रदूषणासंदर्भात दाखल झालेल्या ‘सुमोटो’ जनहित याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने सार्वजनिक रस्ते आणि ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी घालण्याचे तोंडी निर्देश दिले. तसेच मिरवणुकांमध्ये आवाज वाढवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या उपकरणांवरही बंदीचे निर्देश देण्यात आले.
न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. गणेशोत्सव, तसेच अन्य धार्मिक उत्सवांमध्ये निर्धारित वेळ आणि ध्वनिमर्यादांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने सोमवारी स्वतःहून ही याचिका दाखल करून घेतली होती. त्यानंतर मंगळवारी सकाळ आणि दुपारच्या सत्रात या प्रकरणावर सविस्तर सुनावणी झाली. (Bombay High Court Firecracker Ban)
वायुप्रदूषणाचीही चिंता
सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडल्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. त्याचबरोबर फटायांमधून निघणार्‍या धुरामुळे वायुप्रदूषणातही वाढ होते. विशेषतः मुंबईसारख्या शहरांमध्ये सप्टेंबर-ऑटोबरदरम्यान हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न गंभीर होतो. या पार्श्वभूमीवर फटायांच्या वापरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणार्‍या परिणामाबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त केली. सण-उत्सव साजरे करण्यास न्यायालयाचा विरोध नसला, तरी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून सार्वजनिक रस्ते आणि ठिकाणी फटायांचा वापर रोखण्याची गरज असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. यासंदर्भात लवकरच सविस्तर लेखी आदेश जारी केला जाणार असल्याचेही न्यायालयाने सांगितले. (Bombay High Court Firecracker Ban)
ध्वनिक्षेपकासाठी परवानगीचे पत्रक लावावे लागणार
धार्मिक मिरवणुका आणि विसर्जन सोहळ्यांमध्ये ध्वनिक्षेपक किंवा अ‍ॅम्प्लिफायरचा वापर करताना नियमांचे पालन करणे बंधनकारक असेल. ध्वनिक्षेपक वापरण्यासाठी संबंधित प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक असून, ही परवानगी मिळाल्याचे पत्रक किंवा फलक दर्शनी भागात लावणे आवश्यक करण्यात येणार आहे. परवानगीचे पत्रक नसताना ध्वनिक्षेपकाचा वापर केल्यास संबंधित उपकरणांवर कारवाई होऊ शकते. (Bombay High Court Firecracker Ban)
‘नियम आहेत, मग अंमलबजावणी का होत नाही?’
ध्वनिप्रदूषण आणि पर्यावरणासंदर्भात आधीपासूनच स्पष्ट कायदे व नियम अस्तित्वात असताना त्यांचे उल्लंघन होत असल्याबाबत न्यायालयाने राज्य सरकारला प्रश्न विचारले. नियम असतानाही नागरिकांकडून ध्वनिप्रदूषणाच्या तक्रारी का येत आहेत आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल खंडपीठाने केला. (Bombay High Court Firecracker Ban)
आधीच्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर
ध्वनिप्रदूषण आणि फटायांमुळे होणार्‍या प्रदूषणासंदर्भात यापूर्वीच कायदे, नियम आणि न्यायालयीन आदेश अस्तित्वात आहेत. त्यामुळे प्रत्येक बाबतीत नवे नियम करण्यापेक्षा विद्यमान नियमांची कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. खंडपीठाने फटाके, ध्वनिक्षेपक, अ‍ॅम्प्लिफायर आणि ध्वनिमर्यादांचे उल्लंघन याबाबत प्रशासनाने आधीच्या न्यायालयीन निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट केले आहे. सार्वजनिक ठिकाणी फटायांवरील बंदी, ध्वनिमर्यादांचे पालन आणि नियमभंग झाल्यास उपकरणे जप्त करण्यासंदर्भातील निर्देश लेखी आदेशात स्पष्ट केले जाणार आहेत. (Bombay High Court Firecracker Ban)
 
 




संबंधित मजकूर