जिल्हा प्रशासन पोहोचले नागरिकांच्या दारी; योजनांची थेट माहिती

भिवंडी, डोंबिवली, अंबरनाथमध्ये ‘लोकसंवाद’ अभियान; महिला, बालक आणि वंचित घटकांच्या योजनांबाबत जनजागृती

    22-Sep-2026
 
Thane Lok Samvad Campaign      
 
ठाणे (Thane Lok Samvad Campaign) : शासकीय कल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत थेट पोहोचविण्यासोबतच त्यांच्या अडचणी आणि प्रश्न जाणून घेण्यासाठी ठाणे जिल्ह्यात ‘लोकसंवाद’ अभियानाच्या माध्यमातून प्रशासन नागरिकांच्या दारी पोहोचत आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या पुढाकाराने भिवंडी, डोंबिवली आणि अंबरनाथ येथे आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांत विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत योजना, कायदे आणि उपलब्ध सुविधांची माहिती दिली. (Thane Lok Samvad Campaign)
 
भिवंडीत विविध विभागांचा एकत्रित संवाद
 
भिवंडीतील धामणकर नाका मित्र मंडळात झालेल्या ‘लोकसंवाद’ उपक्रमात महसूल, महापालिका, समाजकल्याण, महिला व बालविकास आणि आरोग्य विभागाचे अधिकारी सहभागी झाले. तहसीलदार अभिजीत खोले, भिवंडी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, समाज विकास अधिकारी मिलिंद पळसुले, महिला संरक्षण अधिकारी लक्ष्मी राठोड आणि आरोग्य अधिकारी डॉ. बुशरा सय्यद यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. (Thane Lok Samvad Campaign)
 
महिला संरक्षण अधिकारी लक्ष्मी राठोड यांनी एकल महिला सर्वेक्षण, निराधार, विधवा व परित्यक्ता महिलांसाठीच्या योजना, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा आणि महिलांना उपलब्ध कायदेशीर संरक्षणाबाबत माहिती दिली. तहसीलदार खोले यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह सामाजिक सहाय्य योजनांची माहिती दिली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी वंचित घटकांसाठीच्या विविध योजनांची माहिती दिली, तर आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्य योजना, तपासणी सुविधा आणि शासकीय आरोग्य साहाय्याबाबत मार्गदर्शन केले. (Thane Lok Samvad Campaign)
 
डोंबिवलीत बालहक्क आणि संरक्षणावर भर
 
डोंबिवलीतील शिवराज गणेश मंडळात झालेल्या लोकसंवादात बालकांचे हक्क, सुरक्षितता आणि कल्याणकारी योजनांवर विशेष भर देण्यात आला. महिला व बालविकास विभागाच्या संरक्षण अधिकाऱ्यांनी बालक व पालकांशी संवाद साधला. (Thane Lok Samvad Campaign)
 
यावेळी ‘बालसंगोपन योजना’, अनाथ व निराधार बालकांसाठी उपलब्ध आर्थिक मदत, अर्ज प्रक्रिया याबाबत माहिती देण्यात आली. तसेच बालविवाह प्रतिबंधक कायदा आणि लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण करणाऱ्या पोक्सो (POCSO) कायद्याच्या तरतुदी सोप्या भाषेत समजावून सांगण्यात आल्या. अनुचित प्रकार घडल्यास तक्रार कशी नोंदवावी, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. (Thane Lok Samvad Campaign)
 
अंबरनाथमध्ये महिला सक्षमीकरणाच्या योजनांची माहिती
 
अंबरनाथमधील दीपक मित्र मंडळात झालेल्या लोकसंवाद कार्यक्रमात महिला व बालविकास विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, सुरक्षितता, कौशल्य विकास, पोषण आणि बालकांच्या संरक्षणाशी संबंधित योजनांचे स्वरूप, पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. (Thane Lok Samvad Campaign)
 
या तिन्ही ठिकाणी नागरिकांनी अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधत विविध योजनांबाबत प्रश्न विचारले. अधिकाऱ्यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार जाण्याऐवजी विविध विभागांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचावा, हा ‘लोकसंवाद’ उपक्रमाचा उद्देश आहे. (Thane Lok Samvad Campaign)
 
महिला, बालक, वंचित आणि गरजू घटकांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन आणि नागरिक यांच्यातील थेट संवाद अधिक प्रभावी करण्यावर या उपक्रमातून भर देण्यात आला. (Thane Lok Samvad Campaign)
 
 




संबंधित मजकूर