गरबा नाईटला भाड्याने पार्टनर मिळण्याच्या जाहीरातीने वाद आ. संजय उपाध्याय यांची पोलिसांकडे चौकशीची मागणी

‘Rent a Garba Partner’ नावाचा धक्कादायक प्रकार उघड

    

Rent a Garba Partner
 
मुंबई : नवरात्री आणि गरबा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह बोरीवली विधानसभा मतदारसंघात गरबा कार्यक्रमाच्या निमित्ताने ‘Rent a Garba Partner’ या नावाखाली महिला-पुरुष तसेच तरुण-तरुणींना ठरावीक शुल्क आकारून गरबा पार्टनर म्हणून उपलब्ध करून देण्यासंदर्भातील जाहिराती सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी करून गैरप्रकार आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आमदार संजय उपाध्याय यांनी पोलिसांकडे केली आहे.
(Rent a Garba Partner)
 
या संदर्भात आ. संजय उपाध्याय यांनी मुंबई पोलीस आयुक्त तसेच परिमंडळ ११ आणि १२ चे पोलीस उपायुक्त यांना पत्र दिले आहे. या उपक्रमामध्ये एक हजार रुपयांपासून तर साडे सहा हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारून पार्टनर उपलब्ध करून देण्याच्या जाहिराती होत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
(Rent a Garba Partner)
 
सखोल चौकशीची मागणी
 
तसेच या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन त्याची सखोल चौकशी करावी. चौकशीदरम्यान कायद्याचे उल्लंघन, महिलांची फसवणूक, गैरवापर अथवा अन्य कोणताही अनैतिक किंवा बेकायदेशीर प्रकार आढळून आल्यास संबंधित आयोजक, जाहिरातदार आणि जबाबदार व्यक्तींविरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी उपाध्याय यांनी केली आहे. अशा प्रकारच्या जाहिराती आणि उपक्रमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून महिला आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (Rent a Garba Partner)
 
 
 




गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
संबंधित मजकूर