ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभर सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत महाराष्ट्रातील १५० नवीन १०८ रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नवीन रुग्णवाहिकांची पाहणी करून त्यातील वैद्यकीय सुविधांची माहिती घेतली. रुग्णवाहिका लवकरात लवकर शासकीय सेवेत दाखल करण्याची प्रक्रिया निश्चित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. (Maharashtra 108 Ambulances)
महाराष्ट्र शासनाच्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा प्रकल्पांतर्गत एकूण १,७५६ रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार आहेत. यामध्ये जीवनरक्षक (ALS) आणि मूलभूत जीवनरक्षक (BLS) रुग्णवाहिकांसह नवजात बालकांसाठीच्या रुग्णवाहिका, दुचाकी रुग्णवाहिका तसेच नदी आणि समुद्री बोट रुग्णवाहिकांचा समावेश आहे. (Maharashtra 108 Ambulances)
या रुग्णवाहिकांमध्ये ईसीजी, ट्रान्सपोर्ट व्हेंटिलेटर, पल्स ऑक्सिमीटर, सक्षन पंप आणि ऑक्सिजन वितरण प्रणाली यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच रुग्णवाहिकेतून रुग्णालयातील डॉक्टरांशी थेट संवाद साधण्याची सुविधाही देण्यात आली आहे. (Maharashtra 108 Ambulances)
या योजनेत २५५ ALS आणि १,२०४ BLS रुग्णवाहिका, ३६ नवजात बालकांसाठीच्या रुग्णवाहिका, १६६ दुचाकी रुग्णवाहिका, १५ नदी बोट रुग्णवाहिका आणि १० समुद्री बोट रुग्णवाहिकांचा समावेश आहे. (Maharashtra 108 Ambulances)
‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत पहिल्या टप्प्यात १५० रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत दाखल करण्याच्या तयारीचा भाग म्हणून शिंदे यांनी वाहनांची प्रत्यक्ष पाहणी केली. उपलब्ध वैद्यकीय उपकरणांची माहिती घेत त्यांनी काही आवश्यक बदलांच्या सूचनाही केल्या. (Maharashtra 108 Ambulances)
यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, कुटुंब कल्याण आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव नवीन सोना, सुमित फेसिलिटीजचे संचालक सुमित साळुंखे यांच्यासह सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. (Maharashtra 108 Ambulances)