मुंबई (JioHome 30 and 100 Mbps Plans) : जिओहोमच्या ३० एमबीपीएस आणि १०० एमबीपीएस प्लॅनच्या ग्राहकांना आता ‘ॲमेझॉन प्राइम लाइट’ची एक वर्षाची सदस्यता मोफत मिळणार आहे. जिओहोमच्या ‘थ्री-इन-वन टीव्ही’, ‘ओटीटी’, ‘वाय-फाय प्लॅन’च्या नवीन तसेच विद्यमान ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय हा लाभ मिळेल. जिओच्या १० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाच्या निमित्ताने कंपनीने ही विशेष ऑफर सादर केली आहे. एक वर्षाच्या ‘ॲमेझॉन प्राइम लाइट’ सदस्यतेअंतर्गत ग्राहकांना ‘प्राईम व्हिडिओ’वर विविध चित्रपट आणि शो पाहता येणार आहेत. याशिवाय ‘ॲमेझॉन’वरील ‘ऑर्डर्स’साठी मोफत आणि जलद डिलिव्हरीची सुविधाही मिळणार आहे. (JioHome 30 and 100 Mbps Plans)
ही ऑफर १९ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे. येत्या दोन आठवड्यांत या प्लॅनच्या सर्व ग्राहकांपर्यंत पोहोचेल. ‘मायजिओ ॲप’च्या ‘होमपेज’वर ‘ॲमेझॉन प्राइम लाइट ऑफर’चा बॅनर दिसेल. ग्राहकांनी या बॅनरवर टॅप केल्यानंतर एक वर्षाची मोफत सदस्यता सक्रिय करता येईल. सदस्यतेचे १२ महिने मोजण्यास ती सक्रिय केल्याच्या दिवसापासून सुरुवात होईल. दरम्यान, ₹८८८, ₹१,१९९ आणि १५० एमबीपीएस किंवा त्याहून अधिक स्पीडच्या प्लॅनच्या ग्राहकांना यापूर्वीपासून मिळत असलेला २४ महिन्यांचा ॲमेझॉन प्राईम लाइट लाभ यापुढेही सुरू राहणार आहे. या लाभामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. (JioHome 30 and 100 Mbps Plans)
मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.